Antilia Explosive Case : अँटिलिया स्फोटके प्रकरण; आरोपी रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिन

author img

By

Published : Dec 23, 2022, 11:40 AM IST

Antilia Explosive Case

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी ( antilia explosive case ) रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. रियाजुद्दीन काझीच जामीन अर्ज (Riyazuddin Kazis bail application) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. युक्तीवादा दरम्यान वकील युग चौधरी यांनी म्हटले की रियाजुद्दीन काझी कर्तव्यावर असलेल्या आपल्या अधिकाऱ्याचे पालन करत होते. ( Bombay HC granted bail to Riyazuddin Qazi )

मुंबई : आरोपी रियाझुद्दीन काझी याला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे. त्याला पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. त्याला दर शनिवारी एनआयए कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. जामीन अर्जावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. माजी पोलीस अधिकारी रियाजुद्दीन काझी हे सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आहेत. रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने अटक ( Riazuddin Qazi arrested by NIA ) केली होती. रियाजुद्दीन काझीने जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. ( Antilia Explosive Case )


रियाजुद्दीन काझी युक्तिवाद : रियाजुद्दीन काझी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील युग चौधरी यांनी रियाजुद्दीन काझी युक्तिवाद (Riyazuddin Qazi Arguments) केला आहे. युक्तीवादा दरम्यान वकील युग चौधरी यांनी म्हटले की रियाजुद्दीन काझी कर्तव्यावर असलेल्या आपल्या अधिकाऱ्याचे पालन करत होते. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या सूचनेनुसारच त्यांनी काम केले आहे. तसे सर्व वहीमध्ये नोंद देखील घेण्यात आलेले आहे. सचिन वाझे हे रियाजुद्दीन काझी यांचे वरिष्ठ पदावर असलेले अधिकारी होते. त्यांच्या आदेशानुसार त्यांनी त्यांचे काम केले आहे. या सर्व प्रकरणात रियाजुद्दीन काझी यांचा कुठलाही सहभाग दिसून येत नाही असे देखील वकील युग चौधरी यांनी युक्तीवादा दरम्यान म्हटले होते. (Antilia Explosive Case )

स्फोटक प्रकरणाच्या कटात सहभाग : रियाजुद्दीन काझी यांची अनेक वेळा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने रियाजुद्दीन काझी यांचीही चौकशी केली होती. वाझेंच्या अटकेपासूनच रियाजुद्दीन काझीही एनआयएच्या रडारवर होते. स्फोटक प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे रियाजुद्दीन काझीना अटक करण्यात आली होती. सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, प्रदीप शर्मा यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.



कोण आहेत एपीआय रियाझ काझी ? रियाझ काझी हे 2010 च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली. पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययू पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.



काय आहे प्रकरण : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.