ETV Bharat / state

BMC Dead Body Bag Scam : कोविड घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकरांनी मागितली मुदतवाढ, २३ तारखेला होणार चौकशी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 5:16 PM IST

Updated : Nov 10, 2023, 10:47 PM IST

BMC Dead Body Bag Scam
BMC Dead Body Bag Scam

BMC Dead Body Bag Scam : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) कोविड घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. मात्र, पेडणेकरांच्या वकिलानं ईडी अधिकाऱ्यांकडं विनंती करत चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे. दरम्यान १० तारखेला कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

मुंबई BMC Dead Body Bag Scam : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) काल मुंबई महानगरपालिकेचं अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांची कोविड दरम्यान झालेल्या विविध गैरप्रकारांबाबत सुमारे 6 तास चौकशी केली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज ईडीनं कोविड काळात वाढीव दरानं मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांच्या वकिलानं ईडी अधिकाऱ्यांकडं चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे. आता १० तारखेला कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

निविदा प्रक्रियेत घोटाळा : अंमलबजावणी संचालनालयानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), माजी उपमहापालिका आयुक्त (खरेदी/सीपीडी) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यांच्यावर कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात झालेल्या निविदा प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2 हजार रुपयांऐवजी 68 हजारांना विकत घेतल्याचा आरोप आहे. तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, खरेदी विभागाचे तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉडी बॅग घोटाळ्यात गुन्हा दाखल : पेडणेकर यांच्याविरुद्ध बॉडी बॅगमधील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेडणेकर, BMC च्या इतर वरिष्ठ अधिकार्‍यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम 409, 420,120B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड महामारीदरम्यान बीएमसीच्या कामकाजातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीनं पेडणेकरांना नोटीस बजावली आहे. 18 जुलै रोजी, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी कोरोना महामारीच्या काळात खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप तक्रार दाकल केली होती.

हेही वाचा -

  1. BMC Dead Body Bag Scam : किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, महापालिका अतिरिक्त आयुक्तांची आज होणार चौकशी
  2. Mumbai Covid Scam : काही दिवसातच संजय राऊत कारागृहात - नितेश राणे
  3. BMC Covid Scam : कथित कोविड घोटाळा प्रकरण; विशेष तपास पथक आज बीएमसी कार्यालयात झाडाझडती घेण्याची शक्यता
Last Updated :Nov 10, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.