ETV Bharat / state

Aam Aadmi Party : भाजप, शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

author img

By

Published : Jan 5, 2023, 4:47 PM IST

मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली ( Mumbai Municipal Corporation Election ) आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, कार्यकर्त्यांनी आपमध्ये प्रवेश केला ( BJP Shiv Sena congress workers join Aam Aadmi Party ) आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय. प्रिती शर्मा मेनन यांनी सर्वांचे आम आदमी पक्षात स्वागत केले.

BJP Shiv Sena workers join Aam Aadmi Party
भाजप शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश

भाजप शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश

मुंबई : मुंबईतील दहिसरमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश ( BJP Shiv Sena congress workers join Aam Aadmi Party ) केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात (Big blow to BJP ) आहे. यावेळी प्रिती शर्मा मेनन यांनी सर्वांचे आम आदमी पक्षात स्वागत केले.

देवेंद्र फडणवीस मुंबईविरोधी : 'आप'च्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेमन म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे मुंबईविरोधी आहेत. मुंबईऐवजी ते बिल्डर आणि मुंबईतील खासगी लोकांना विकून भाजपसाठी पैसा गोळा करत आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर आरेचे कॅग अहवाल ऑडिट झाले नाही, आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यावर कॅग ऑडिट करून घेऊ. महाराष्ट्र हे संत आणि महापुरुषांचे राष्ट्र आहे. हे लोक आमचे वीर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्या आदर्शावरुन भाष्य करतात, ही भाजप महाराष्ट्र विरोधी विष आहे.

दिल्ली पॅटर्न : दिल्ली, पंजाब नंतर आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) दिल्ली पॅटर्न राबवण्याचा आपचा प्रयत्न आहे. आम् आदमी पक्षाला गुजरातमध्ये यश मिळालं नसलं ( Aam Aadmi Party ) तरी गुजरातच्या जनतेच्या मतदानाच्या जोरावर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.

गोपाल इटालिया महाराष्ट्राचे सहप्रभारी : आम आदमी पक्षाने गोपाल इटालिया ( Aam Aadmi Party leader Gopal Italia) यांची महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून निवड केली आहे. ( sah prabhari of Maharashtra AAP). यासोबतच गोपाल इटालिया यांना आपचे राष्ट्रीय सहसचिव बनवण्यात आले आहे. (Gopal Italia to be sah prabhari of Maharashtra AAP). तसेच इसुदान गढवी यांची गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने वेगवेगळ्या झोनमध्ये सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

गुजरातमध्ये नवी पक्ष संघटना : विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने आपली नवी संघटना स्थापन केली आहे. पक्षाने नव्या संघटनेत मोठे बदल केले आहेत. त्यानंतर आम आदमी पार्टीने इसुदान गढवी यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. याशिवाय अल्पेश कथिरिया आणि चैतर वसावा यांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आगामी गुजरात निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.