ETV Bharat / state

BJP Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा; भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

author img

By

Published : Feb 6, 2023, 1:48 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा काढला.

NCP is ready to give Mahaprasad to BJP workers
भाजपच्या कार्यकर्त्यांना महाप्रसाद देण्यासाठी राष्ट्रवादी तयार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई: महापुरुषांच्या बाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या नेत्यांना आठवत नाही का? राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याबाबतही भारतीय जनता पक्ष शब्द काढत नाही. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नसून त्या वक्तव्याचा विपर्यास करून याबाबत भारतीय जनता पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महबूब शेख यांनी केला आहे.




वादग्रस्त वक्तव्य: पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बोलताना एक वक्तव्य केले. भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना शिक्षण मंत्री विनोद तावडे हे होते. मुघलांचा इतिहासच पाठ्यपुस्तकातून काढण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू होता. जर मुघलांचा इतिहासच काढला तर छत्रपती शिवाजी महाराज काय गोट्या खेळत होते का? असे दाखवणार का? अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमादरम्यान केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे.



पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त: भारतीय जनता पक्षाकडून मोर्चाच्या देण्यात आलेल्या विचारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. परिस्थिती चिघळू नये आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते समोरासमोर येऊ नये. यासाठी पोलिसांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कार्यालय परिसराच्या बाहेर पडणार नाहीत याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन आल्यास ते प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत यासाठी देखील पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

भाजप आक्रमक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरच्या परिसरामध्ये पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना अडवले आहे.

कार्यकर्त्ये पोलिसांच्या ताब्यात: दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये याची दक्षता घेत पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे नेते जितेंद्र सिंह तीवणा यांनी इशारा दिला होता. पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातच अडवल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला काळ फासण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.

आव्हाड यांनी केले ट्विट: पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बोलताना एक वक्तव्य केले होते. यासंदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा ट्विट केले. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा, असे ते म्हणाले. भाजपचे राज्यात सरकार असताना शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. मुघलांचा इतिहासच पाठ्यपुस्तकातून काढण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू होता. मुघलांचा इतिहासच काढला तर छत्रपती शिवाजी महाराज काय गोट्या खेळत होते का? असे दाखवणार का? अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमादरम्यान केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad tweet On Ramayana रावण काढून रामायणातला राम समजावून सांगा आव्हाडांचे नवे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.