ETV Bharat / state

BJP Protest Against intruder Bangladeshi : भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या विरोधात भाजपचे दादरमध्ये आंदोलन

author img

By

Published : Jan 7, 2023, 7:34 PM IST

BJP Protest Against intruder Bangladeshi At Dadar
भाजपचे दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये भाजपने घुसखोर बांग्लादेशी ( BJP Protest Against intruder Bangladeshi And Rohingya ) नागरिकांविरोधात आंदोलन केले. यावेळी आशिष शेलार ( Ashish Shelar Protest Against intruder Bangladeshi ) यांनी महापालिकेसह पोलीस प्रशासनाचेही कान टोचले. बांग्लादेशी घुसखोरांना हुसकावून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई - स्थानिक भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी भाजपने आज दादर रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन केले. घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना ( BJP Protest Against Bangladeshi Rohingya ) हटवा, दादर वाचवा, दादरकरांच्या पैशावर बांगलादेशी, रोहिंग्याना पोसणाऱ्या जमालला अटक करा, अशा घोषणा देत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar Protest Against intruder Bangladeshi ) यांच्या नेतृत्वात दादर पश्चिम ( BJP Protest Against intruder Bangladeshi At Dadar ) रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

घुसखोर बांगलादेशी विरोधात आंदोलन भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज दादर पश्चिम येथे घुसखोर बांगलादेशी ( BJP Protest Against intruder Bangladeshi ) यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले, बांगलादेशमधून येवून दादरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बांगलादेशी रोहिंगे दादागिरी ( intruder Bangladeshi People At Dadar ) करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जीवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे हे भाजप कदापी खपवून घेणार नाही. स्थानिक भूमिपुत्राला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्यासाठी भाजप त्यांच्या पाठीशी कायम आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बांगलादेशी घुसखोरांवर, जे भारतीय नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. या विषयाचा पाठपुरावा केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही आशीष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) यांनी दिला.

BJP Protest Against intruder Bangladeshi At Dadar
भाजपचे दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन

फेरीवाल्यांसाठी सुरू केलेली योजना बंद पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी सुरू केलेली योजना बंद करण्यात आली. त्या योजनेला प्रचंड विरोध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या काळात केवळ ८ हजार फेरीवाल्यांना मदत मिळाली. तर शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात १ लाख १२ हजार स्थानिक फेरीवाल्यांना मदत मिळाली, असा दावा शेलार यानी केला. स्थानिक फेरीवाल्यांची मदत थांबवण्यापेक्षा जमाल शमशुद्दीनला शोधा असा टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला. दादर, माहीम परिसर गल्ल्यांमधील अनधिकृत घुसखोरी केलेल्या फेरीवाल्यांना शोधून हा परिसर मोकळा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शमशुद्दीनला शोधा नाहीतर आमच्या भाषेत प्रसाद देवू महापालिका आणि पोलीस प्रशासनाने गरीब प्रामाणिक फेरीवाल्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये असेही ते म्हणाले. तुम्ही शमशुद्दीनला शोधा नाहीतर आम्ही त्याला आमच्या भाषेत प्रसाद देवू अशा शब्दात शेलार यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला इशारा दिला. यावेळी त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे कानही टोचले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.