ETV Bharat / state

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडीमुळे रखडला; भाजपाची टीका

author img

By

Published : Dec 10, 2022, 6:12 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) महाविकास आघाडीच्या सरकारमुळे विलंब झाला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. ते म्हणाले की, जे तंत्रज्ञान जपानने बुलेट ट्रेन ( Bullet Train ) साठी वापरले आहे तिथे अपघात शून्य टक्के आहे. तर ते तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या देशाचा विकास करायला विलंब का लावावा. मात्र महाविकास आघाडी शासनाने याला विलंब लावला, त्यामुळेच हा प्रकल्प रखडला."

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात ९४ टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली आहेत. कामे वेगाने करण्यासाठी राज्य सरकारनेही २५ टक्के भागीदारी केली आहे. बुलेट ट्रेनच्या साठी रस्त्यामध्ये आडवी येणारी झाड ती कापण्यासाठी राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने केलेल्या अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे समर्थक आणि विकासाचे समर्थक यांच्यातील चर्चा पुन्हा जोराने सुरू झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या विलंबामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर ( MLA Atul Bhatkhalkar critics on Mahavikas Aghadi ) यांनी केली आहे.

महाविकास आघाडीमुळे प्रकल्प रखडला: आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, " एक लाख दहा हजार कोटीचा हा प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन रेल्वे मार्ग केवळ महाविकास आघाडी सरकारच्या वेळ काढूपणामुळे रखडलेला होता. लोकांना जमिनीचे पाचपट पैसे या प्रकल्पामुळे मिळत होते. मात्र महाविकास आघाडी शासनाने जे धोरण अवलंबले त्यामुळे ते देखील शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना मिळाले नाही. या प्रकल्पामुळे हजारो कोटी रुपयांची निविदा जी जारी होणार होती. ती भारतातीलच उद्योजकांना मिळणार होती. परंतु त्यांना ती विलंबाने मिळाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मिळून जी गती मिळायला हवी होती ती यामुळे मिळाली नाही. जे तंत्रज्ञान जपानने बुलेट ट्रेन साठी वापरले आहे तिथे अपघात शून्य टक्के आहे तर ते तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या देशाचा विकास करायला विलंब का लावावा. मात्र महाविकास आघाडी शासनाने याला विलंब लावला त्यामुळेच हा प्रकल्प रखडला."


बुलेट ट्रेन प्रकल्प: बुलेट ट्रेन साठी मुंबई ते अहमदाबाद या मार्गामध्ये राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने 20,000 झाड तोडण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता .त्याला न्यायालयाने नुकतीच अनुमती दिली आहे.
बुलेट ट्रेन ही ताशी 320 किलोमीटर धावू शकते आमदाबाद ते मुंबई केवळ तीन तासात ही ट्रेन टप्पा गाठू शकते. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असल्यामुळे या ट्रेनचा खर्च देखील अफाट आहे. ट्रेन मधील खुर्च्या या अत्यंत आरामदायक आहेत संपूर्ण ट्रेन वातानुकूलित आहे स्वयंचलित दरवाजे आहे. तसेच इतर ट्रेन पेक्षा वंदे भारत ट्रेनमध्ये प्रसाधनगृहाची सोय अत्यंत सुसज्ज आणि नव्या पद्धतीची आहे. एरवी मेल एक्सप्रेस एसी डब्यातील प्रसाधनगृहाची व्यवस्था अत्यंत अडचणीची आणि कमी जागा असते मात्र या ठिकाणी अधिकाधिक जागा आणि खुलेपणा, खेळती हवा असेल असा प्रयत्न केला गेला आहे.


बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च: मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार 10,000 कोटी रुपये, गुजरात सरकार 5,000 कोटी रुपये आणि महाराष्ट्र सरकार 5,000 कोटी रुपये नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला देणार आहे. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजदराने कर्ज घेतली जाईल.


तिकीटावर बोजा पडणार का? बुलेट ट्रेन साठीचा वाढलेला खर्च, त्याचा प्रवाशांवरही येणारा भार, येत्या काळात आणखी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आणि महत्त्वाचे म्हणजे बुलेट ट्रेन प्रवाशांना परवडणारी असेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदाबाद ते मुंबई तिकीट काय असेल याबद्दल अंदाज असा वर्तवला जात आहे की मेल एक्सप्रेस ट्रेनच्या प्रथम दर्जाच्या वातानुकलीत तिकिटापेक्षा दीड ते दोन पट महाग किमतीचे हे तिकीट असणार.

प्रवासाचे अंतर अडीच तास: मुंबई ते अहमदाबाद विमान सेवा, १४० हून अधिक जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वेगाड्या, सहा पदरी रस्ते या दोन शहरादरम्यान आहेत. या मार्गावर रेल्वेने सहा ते सात तासांत प्रवास होतो. रस्ते मार्गेही साधारण तेवढाच वेळ लागतो. आता अवघ्या अडीच तासांत अंतर पार करणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न केंद्र सरकारने बाळगले आहे. हा प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग मुंबई नंतर ठाण्याच्या खाडी मधून जाणार आहे. 'या खाडीमध्ये फ्लेमिंगो हे जागतिक महत्त्वाचे पक्षी या भागात असल्यामुळे या ठिकाणीच शेजारी मँग्रोज चे अभयारण्य देखील आहे .त्यामुळे बुलेट ट्रेन चा रेल्वे मार्ग एका बोगद्यातून समुद्राखालून केला जाणार आहे. यामुळे मँग्रोजला धक्का लागणार नाही आणि त्यात पर्यावरणाला देखील बाधा होणार नाही;' असे राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाचे म्हणणे आहे. समुद्राखाली सात फूट इतक्या आत मध्ये हा मार्ग असेल आणि याचा बोगदा हा 13.2 मीटर इतका असणार आहे.


पर्यावरणाची हाणी होऊ नये: पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्ते जोरू बथेना यांनी बुलेट ट्रेनसाठी हजारो झाडे तोडण्याला न्यायालयाची अनुमती मिळाल्यानंतर खेद व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात, "बुलेट ट्रेन किंवा कोणताही प्रकल्प पुढे रेटण्यासाठी पर्यावरणाचा नाश करणं जंगल तोड करणे हाच एक पर्याय नाही. अजून दुसरे अनेक पर्याय आहे .सरकार कोर्टात म्हणते त्यापेक्षा दहा पटीने हजारो झाड यामुळे तोडले जाणार आहे. पर्यावरणाची हजारो वर्षा पासून तयार झालेले मंग्रोव्हज जंगलाची नासाडी होणार नाही .जंगलतोड होणार नाही या पद्धतीचं विकासाचे नियोजन सरकार का करत नाही? असा सवाल त्यांनी केला.

मुंबई ते हैद्राबाद बलेट ट्रेन? : "हैदराबाद ते मुंबई राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे मार्गाचे देखील प्रस्तावाची चर्चा 2020 या काळात झाली होती .711 किलोमीटर लांबीचा हैदराबाद ते मुंबई हा बुलेट ट्रेन चा मार्ग साडेतीन तासांमध्ये सहज पार करता येईल या तऱ्हेचा चर्चा त्यावेळेला झाली होती यामध्ये हैदराबाद, जहीराबाद, कलबुर्गी, सोलापूर, पंढरपूर ,अकलूज ,दौंड ,पुणे, लोणावळा, मुंबई आणि नवी मुंबई असा तो मार्ग असल्याचे त्यावेळी चर्चा झाली होती. मात्र पुढे त्याची ठोस आखणी झाली नाही. कारण त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे" राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्यांनी ईटीव्ही भारतला अद्ययावत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.