ETV Bharat / state

योग्य तो निर्णय घेऊन राज्यपालांना निर्णय देणार - सुधीर मुनगंटीवार, दुपारी ४ वाजता पुन्हा बैठक

author img

By

Published : Nov 10, 2019, 12:02 PM IST

Updated : Nov 10, 2019, 3:30 PM IST

राज्यपाल महोदयांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आमंत्रित केले आहे. आज आता आम्ही बैठक घेतली यात या निमंत्रणाच्या संदर्भांत चर्चा झाली. ४ वाजता पुन्हा यांसंदर्भात चर्चेसाठी बैठक होणार आहे. तसेच आम्ही योग्य तो विचारविनिमय करून राज्यपालांना निरोप देणार आहोत.

BJP core committee meeting at cm house varsha in mumbai

मुंबई - योग्य तो निर्णय घेऊन राज्यपाल यांना कळवणार असल्याचे अर्थमंत्री आणि जेष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच ४ वाजता पुन्हा भाजप कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात होती. बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार ते माध्यमांशी बोलत होते.

योग्य तो निर्णय घेऊन राज्यपालांना निर्णय देणार - सुधीर मुनगंटीवार

राज्यपाल महोदयांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आमंत्रित केले आहे. आज आता आम्ही बैठक घेतली यात या निमंत्रणाच्या संदर्भांत चर्चा झाली. ४ वाजता पुन्हा यांसंदर्भात चर्चेसाठी बैठक होणार आहे. तसेच आम्ही योग्य तो विचारविनिमय करून राज्यपालांना निरोप देणार आहोत. ४ वाजेची बैठक संपल्यानंतर आम्ही माध्यमांसमोर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळी झालेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडेंसह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर होते.

हेही वाचा - 'शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधात बसण्याची वाट बघतोय'

Intro:फ्लॅश

राज्यपालांना सत्तास्थापनेसाठीचा अवधी वाढवून देण्याची मागणी भाजपकडून करता येण्याची शक्यता....

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात...

बहुमताचा आकडा नसल्याने भाजप सत्तास्थापन करण्यास असमर्थ..

भाजपचे अनेक जेष्ठ नेते कोअर कमिटीच्या बैठकीला हजर..

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील शिवाय पंकजा मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित...

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपकडून शिवसेनेसोबत बोलणी होणार का याकडे लक्ष..

सत्तास्थापनेचा तिढा भाजप सोडवणार ??Body:मConclusion:म
Last Updated :Nov 10, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.