ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

author img

By

Published : Dec 8, 2019, 3:20 PM IST

विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त १०५ जागा मिळूनही सत्तेसापसून दूर राहीलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजपची महत्वाची बैठक होत आहे.

BJP begins preparations for Mumbai municipal elections
आशिष शेलार


मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त १०५ जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजपची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकित संघटनात्मक निवडणुकांच्या कार्यक्रमाबरोबर मुंबई पालिकेच्या निवडणूक कामालाही सुरुवात केली असल्याचे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत होत आहे. महानगरपालिकेच्या २२७ वॉर्ड, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि ६ लोकसभा क्षेत्रांच्या अध्यक्षांशी चर्चा केली जाणार आहे. मुंबईमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपला यावेळी विधानसभेत १७ जागा मिळाल्या असल्याचे शेलार म्हणाले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांच्या कार्यक्रमावर चर्चा होणार आहे. तसेच येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्ती यावर चर्चा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डच्या कामाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:मुंबई |

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आज भाजपची मुंबई येथील वसंत स्मृती येथे बैठक होत आहे. ही बैठक मुंबईसाठी महत्वाची बैठक असल्याचे भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. Body:या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रमाबरोबर मुंबईच्या 227 वॉर्डचे अध्यक्ष, 36 विधानसभा पक्षाचे अध्यक्ष तसेच 6 लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांची येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर र्नियुक्ती यावर चर्चा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डच्या कामाला सुरुवात झाल्याचे देखील ते म्हणाले. तसेच मुंबईत आमचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईत नंबर एकचा पक्ष झालो. त्यामुळे उरलेल्या जागांचे विश्लेषण होत असल्याचे शेलार म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.