ETV Bharat / state

Big Breaking Maharashtra : देवेंद्र फडणवीसांच्या वाढणार अडचणी.. जलयुक्त शिवार योजनेतील कामांची होणार चौकशी

author img

By

Published : Jul 21, 2021, 6:50 AM IST

Updated : Jul 21, 2021, 10:44 PM IST

big breaking update 21 july 2021
बिग ब्रेकिंग

22:44 July 21

फडणवीसांच्या सत्ताकाळात DGIPR अधिका-यांच्या इस्त्रायल दौ-यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई -  DGIPR अधिका-यांच्या इस्त्रायल दौ-याबाबत खुलासा करण्यात आला आहे. तो दौरा कृषी संबंधित नसून विविध 10 विषयांच्या अभ्यासासाठी इस्त्राईल दौरा होता. सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंन्ड्स काय ते समजून घेणे, वेब मीडिया वापरासाठी नव्या मार्गाचा अभ्यास, सायबर गुन्ह्याबद्दल जागृती कशी करावी, नव-नव्या प्रसार माध्यामांच्या वापरा संदर्भात अभ्यास अशा विविध गोष्टींसाठी हा दौरा होता. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दौरा कृषी संदर्भात असल्याचे सांगितलं होते. त्यामुळे सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

21:14 July 21

माळीण परिसरातील रस्ता पावसामुळे खचला स्थानिक भयभीत

आंबेगाव/ पुणे - पुणे जिल्ह्यातील माळीण परिसरातील रस्ता पावसामुळे खचल्याने स्थानिक भयभीत. काही वर्षापूर्वी डोंगर कोसळून माळीण गाव गडप झाले होते. त्यानंतर नागरिकांचे दुसऱ्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र चार दिवस सतत पडत असलेल्या पावसाने रस्ता खचला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. 

20:34 July 21

कोयना धरणातून गुरुवारी 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा - गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता कोयना धरणातून कोयना नदीमध्ये २१०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग  करण्याचे नियोजन आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन युनिट सुरू करणार आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

20:13 July 21

राज्यात रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ, ८१५९ नवीन रुग्ण तर १६५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई - राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून आली. आज दिवसभरात ८,१५९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन ६६ मृत्यूची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन १४७ मृत्यूची नोंद झाली, आज त्यात किंचित वाढ होऊन १६५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.  

19:23 July 21

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार व वाडा तालुक्यात मुसळधार, तांबडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पालघर - जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, वाडा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विक्रमगड तालुक्यातील तांबडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शेवते गावात तांबडी नदीचे पाणी शिरले आहे.

19:22 July 21

ठाण्यात लिटिल फ्लॉवर शाळेसमोर रिक्षावर पडले झाड

ठाणे - ठाण्यातील पोखरण रोड नंबर 2 येथील लिटिल फ्लॉवर शाळेसमोर रिक्षावर झाड पडून रिक्षाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल झाड बाजूला करण्याचे काम करत आहे.

17:53 July 21

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली - आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

17:32 July 21

देवेंद्र फडणवीसांच्या वाढणार अडचणी.. जलयुक्त शिवार योजनेतील कामांची होणार चौकशी

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलशिवार योजनेतील कामांची चौकशी होणार आहे. विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जलशिवार योजनेच्या कामांवर ठपका ठेवला आहे. एसीबीमार्फत चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. अनेक कामांत प्रत्यक्ष काम न करता, बिले मंजूर केल्याचा संशय समितीला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार आहेत.

17:32 July 21

मंत्री यशोमती ठाकुरांनी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट.. श्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्याची मागणी

अमरावती - माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पालखीचे महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचे स्थान आहे. ४२७ वर्षांची ही प्राचीन परंपरा जपण्यासाठी कौंडण्यपूरला राज्यात साकार होत असलेल्या पालखी मार्गाशी जोडण्यात यावे, अशी विनंती महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

16:42 July 21

महाराष्ट्रात 2017-18 मध्ये फोन टॅपिंग झाले होते, केंद्र सरकारच संसदेचे काम चालू देत नाही - नाना पटोले

मुंबई - दिल्लीत मी जे काही बोलायचे ते बोललो आहे. असे नाना पटोले म्हणाले.  महाराष्ट्रात २०१७/१८ मध्ये फोन टॅपिंग झाले होते. जी काही माहिती असते ती सरकारलाच भेटत असते. मध्य प्रदेश व कर्नाटकात निवडणुकीत याचाच वापर केला गेला. हे सविधनाच्या विरोधात आहे. गोपनीयतेचा  भंग यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे.

काँग्रेसकडून उद्या राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना निवेदन देणार आहोत. राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत.  महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, हा निर्णय राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाला आहे. पार्टी हाईकमांडचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. कुठल्याही मंत्र्याचा चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेलेला नाही. केंद्र सरकारने ऑक्सिजन संदर्भात राजकारण करू नये. केंद्र सरकार खोटे बोलत आहे. सर्व सुविधा केंद्र सरकार देणार होते. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झाला नाही, हे खरे आहे. बाजूच्या राज्यात ऑक्सिजन न मिळाल्याने बरेच मृत्यू झाले आहेत.

16:42 July 21

ठाण्यात साजरा होणार दहीहंडी उत्सव, मनसेकडून विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन

ठाणे - शहरात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. ३१ ऑगस्टला ठाण्यात मनसेकडून विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.  दोन लस घेतलेल्या गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवात सामील होण्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी आवाहन केले आहे. कोविडचे सर्व नियम पाळून मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणार आहे.

16:09 July 21

देशात महाराष्ट्र एकमेव राज्य अस आहे जिथे उद्योग 100 टक्के सुरू आहेत - उद्योगमंत्री

नाशिक - कोरोनाकाळात उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देशात महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथे उद्योग 100 टक्के सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.  त्याचबरोबर सुभाष देसाई म्हणाले, की  काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्षे टिकेल. चुकीचे काम केले असेल तर ते उघड होईल आणि त्याचे फळ देखील भोगावे लागेल. विरोधकांवर हेरगिरी करणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल. शिवसेनेचे खासदार या संदर्भात वाचा फोडत आहेत, असेही देसाई म्हणाले.  

16:08 July 21

मुंबई उच्च न्यायालयाकडून दाऊदच्या दोन हस्तकांची शिक्षा कायम

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे हस्तक प्रवीण मिश्रा आणि अभिषेक सिंह या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. वर्ष 2011 मध्ये बिल्डर प्रदीप ढोकलिया यांच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि सुनावणीअंती या दोघांना जन्मठेपेची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली होती.

16:08 July 21

25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींच्या टोळीला लोणी पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर - राहाता येथील वनीकरण विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या बेडवाल यांना 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींच्या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे.

15:42 July 21

मुंबईत पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - मुंबईतील काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.  दरम्यान सकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

15:42 July 21

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 4 दिवसात 70 दिवसांचा पाणी साठा वाढला

मुंबई - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 4 दिवसात 70 दिवसांचा पाणी साठा वाढला असून मुंबईच्या तलावांमध्ये 4 महिने म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे

बुधवारी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजे पर्यंत पडलेला पाऊस मि.मी.मध्ये

शहर - 44.4  

पूर्व उपनगर -  41.0  

पश्चिम उपनगर - 46.8  

15:42 July 21

वाशिममध्ये आठ शेतकऱ्यांच्या शेतामधील खरिपाची पिके मातीसह गेली खरडून

वाशिम - जिल्ह्यातील धारकाटा परिसरातील शेतीचे सलग पडत असलेला पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. धारकाटा परिसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत असून सचिन मोरे, हनुमान खाडे आणि विश्वनाथ खाडे यांच्यासह 7 - 8 शेतकऱ्यांच्या शेतामधील खरिपाची पिके मातीसह नाल्याच्या पुरामुळे खरडून गेल्याने या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील शेतीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने 100 ते 120 हेक्टरवरील खरिपाची सोयाबीन, तूर आणि इतर पिके धोक्यात आली आहेत.

15:41 July 21

वर्धा जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

वर्धा - जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी असून कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.  लाल नाला प्रकल्पाचे पाच गेट 10 सेंटीमीटरने उघडून तर नांद प्रकल्पाची दोन गेट 5 सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणे पूर्ण भरलेली नाहीत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  पावसामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे.

15:41 July 21

नागपुरात सकाळपासून पावसाच्या तुरळक तरी ठिकाणी मध्यम सरी

नागपुरात सकाळपासून पावसाच्या तुरळक तरी ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत.  दुपारपासून पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.  

15:41 July 21

पेगासस प्रकरणावरून काँग्रेसचे गुरुवारी राजभवन येथे ठिय्या आंदोलन

मुंबई - उद्या काँग्रेसचे राजभवन येथे ठिय्या आंदोलन आहे. पेगासस प्रकरणावरून काँग्रेस आंदोलन करणार असून यासंदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे.  नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते आंदोलनात सामील होणार आहेत.  

15:40 July 21

ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षा भिंत कोसळून सात वाहनांचे नुकसान

ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षा भिंत कोसळली. सात वाहनांचे नुकसान. भिंतीला लागून असलेले झाड देखील कोसळले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम रवाना झाली आहे.  

15:40 July 21

मुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था

ठाणे - मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी  साचले आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग, बीडीडीएस, ठाणे नगर वाहतूक शाखा या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. येथील शासकीय रेकॉर्ड भिजण्याची या नष्ट होण्याची शक्यता आहे.

15:16 July 21

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. धोरण ठरवण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. 3 जुलैला यासंदर्भात आदेश देत सुप्रीम कोर्टाने मदत ही दिलीच पाहिजे असं म्हटलं होतं.

12:35 July 21

ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. यात तीन गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. केंद्राने म्हटले आहे की, हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा विषय आहे. हा डाटा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून जमा केला जातो. केंद्र सरकार स्वत: हा डाटा तयार करत नाही. - संबित पात्रा, राष्ट्रीय प्रवक्ते भाजप

10:49 July 21

जर पेगासस प्रकरणांत सरकारचा काहीही सहभाग नसेल तर त्यांना कशाची भीती वाटतेय. सत्य बाहेर यायला हवे. यामुळे संसदेच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत आणि सर्वोच्च न्यायालयामार्फत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच जर रविशंकर प्रसाद सत्तेत नसून विरोधी पक्षात असते तेव्हा देखील त्यांनी हीच मागणी केली असती, असेही ते म्हणाले. 

10:49 July 21

ऑक्सिजनअभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सरकारच्या दिलेल्या या माहितीबद्दल मी निशब्द झालो आहे. ज्या रुग्णांचे ऑक्सिजनभावी प्राण गेले त्यांना सरकारनी केलेल्या या भाष्यानंतर काय वाटले असेल? सरकारविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. ते खोटे बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली.

10:36 July 21

मुंबईत पाऊस

मुंबई - शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता  

  • काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता
  • 45 ते 55 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहणार
  • काही ठिकाणी 60 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहू शकतात
  • हवामान खात्याकडून इशारा देण्यात आल्याची मुंबई महापालिकेने दिली माहिती

मंगळवारी सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात झालेली पावसाची नोंद 

  • शहर विभागात 11.69
  • पश्चिम उपनगरात 13.24
  • पूर्व उपनगरात 17.95
  • मिलिमीटर पावसाची नोंद

सकाळी 9.52 वाजता 4.12 मीटर उंचीची समुद्राला भरती या दरम्यान समुद्रात 4.12 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.

10:36 July 21

कोल्हापूर - पंचगंगा नदी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

  • पंचगंगा नदीची सद्याची पाणी पातळी 29.5 फुटांवर

(पंचगंगा नदी इशारा पातळी : 39 फूट व धोका पातळी - 43 फूट आहे)

  • एकुण पाण्याखालील बंधारे - 17
  • गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस
  • आज आणि उद्या दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
  • जिल्ह्यात अलर्ट जारी

09:45 July 21

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

09:44 July 21

ईद मुबारक! ईदच्या खूप शुभेच्छा. सामूहिक सहानुभूती, समरसता आणि सर्वसमावेशकता या भावनेतून आजच्या दिवसात अधिक चांगली सेवा करा, या शब्दात पतंप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

09:05 July 21

हवामान खात्याकडून नवी मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

09:05 July 21

मुंबई - बकरी ईदच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी माहीम दर्गा परिसरात पोलीस बॅरिकेड्स लावले आहे. कोरोनाच्या नियमांच पालन करत साजरीकरण होणे महत्त्वाचे आहे. सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

07:26 July 21

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईदचा हा म्हणजे प्रेम आणि बलिदानाच्या भावना आणि सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी एकत्र काम करण्यासाठी आदर व्यक्त करण्याचा आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करूया आणि सर्वांच्या आनंदासाठी कार्य करुया, असे ट्विट त्यांनी केले. 

06:38 July 21

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली - आज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामा मस्जिद येथे नमाज पढण्यासाठी मुस्लिम बांधव पोहोचले आहेत.

Last Updated :Jul 21, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.