ETV Bharat / state

Mumbai Project Foundation : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईतील विविध ३२० कामांचे रविवारी भूमिपूजन

author img

By

Published : Feb 25, 2023, 9:56 PM IST

महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे केली जाणार आहेत. या कामांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवार २६ फेब्रुवारी २०२३ चेंबूर (पश्चिम) मध्ये होणार आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई पालिकेने ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामधील ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचे, टिळक नगर, नेहरु नगर, सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे आज रविवारी भूमिपूजन होणार आहे.

यांची उपस्थिती राहणार: मुंबईतील चेंबूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार पूनम महाजन, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, आदी लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण: मुंबई महानगरातील रस्ते कायमस्वरुपी खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करत आहे. त्यातील, एकूण ५२ किलोमीटर लांबीच्या १११ रस्ते कामांची सुरुवात केली जाणार आहे. यात पूर्व उपनगरातील ११.०६ किलोमीटर लांबीचे २४, पश्चिम उपनगरातील ३१ किलोमीटर लांबीचे ६१ रस्ते आणि शहर विभागातील ९.६६ किलोमीटर लांबीचे २६ इयोटी आहेत.


मलनिःसारण वाहिन्या नव्या करणार: महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभागाद्वारे चेंबूर भागातील म्हाडा वसाहतीमधील टिळक नगर, कुर्ला परिसरातील नेहरु नगर व सहकार नगर मधील विद्यमान मलनिःसारण जाळ्याची सुधारणा करण्यासाठी विविध रस्त्यांवर मलनिःसारण वाहिन्या टाकणे ही कामे केली जाणार आहेत. टिळक नगरमध्ये १,३९० मीटर लांब, नेहरु नगरामध्ये १,५५० मीटर लांब तर सहकार नगर येथे २०० मीटर लांब अंतराचे मलनिस्सारण जाळ्याचे काम केले जाणार आहे.



सुमारे १२१ कामे पूर्ण: मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते ८ डिसेंबर आणि १० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १२१ कामे पूर्ण झाली असून त्या कामांना जनतेकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त ३२० कामाचे, भूमिपूजन होणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पामुळे मुंबईचा कायापालट होतो. येणाऱ्या काळात मुंबई शहर अधिक सुंदर व देखणे होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis Nagpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, 'त्या दोन-तीन महिन्यात त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलला.. '

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.