ETV Bharat / state

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना अंतरिम जामीन मंजूर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 10:50 PM IST

Gadling Granted Interim Bail : भीमा कोरेगाव शहरी नक्षलवाद या कथित आरोपात अटकेत असलेले वकील व मानव अधिकार कार्यकर्ते सुरेंद्र गडलिंग यांना मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. (Bhima Koregaon Violence Case) तसेच नागपूरला त्यांची पत्नी, आई, मुलं यांना भेटण्यासाठी देखील विशेष न्यायालयाने परवानगी दिली. न्यायमूर्ती राजेश कटारिया यांनी वकील सुरेंद्र गडलिंग यांना एका आठवड्याच्या मुदतीपुरता हा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे.

Bhima Koregaon Violence Case
सुरेंद्र गडलिंग

मुंबई Gadling Granted Interim Bail : मानव अधिकाराचं काम करणारे वकील सुरेंद्र गडलिंग यांच्यावर कथितरित्या पुण्यात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोप आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने आरोप ठेवून अटक केली होती. त्यांच्यावर काही गंभीर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. (Advocate Surendra Gadling) भीमा कोरेगाव प्रकरणातील एकूण 16 आरोपींच्या पैकी वकील सुरेंद्र गडलिंग हे एक आरोपी आहेत. त्यांनी विशेष न्यायालयामध्ये जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता. राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने न्यायमूर्ती राजेश कटारिया यांनी वकील सुरेंद्र गडलिंग यांना एका आठवड्याच्या पुरता अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. (NIA Special Court)



न्यायालयाने घातलेल्या अटी : विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी आरोपीच्या जामिनाच्या अर्जावर निर्णयात नमूद केलेले आहे की, 25 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या काळाकरिता म्हणजेच एक आठवड्या पुरता हा अंतरिम जामीन आरोपीला देण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात आरोपीने एक लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र न्यायालयात दाखल करावे. त्यासोबतच आरोपीने दोन अधिकृत हमीदार देखील न्यायालयाला दाखवावे. या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.



अंतरिम जामिनाच्या काळात पाळावयाच्या अटी : आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांना नागपूरला त्यांच्या पत्नीला, मुलांना भेटायला जायचे आहे. या काळामध्ये त्यांनी त्यांचा नागपूर ते मुंबईचा प्रवासाचा तपशील दैनंदिन तपशील त्याची नियोजन राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिले पाहिजे. तसेच या अंतरिम जामिनाच्या काळामध्ये कोणत्याही साक्षीदारांना त्यांनी संपर्क करू नये. त्यांचा पासपोर्ट हा तपास यंत्रणाकडे जमा करावा.


काय आहे प्रकरण? पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 या काळामध्ये एल्गार परिषद झाली आणि या परिषदेनंतरच भीमा कोरेगाव या ठिकाणी हिंसाचार झाला. यामध्ये जे 16 आरोपी आहेत त्याच्या पैकी एक वकील सुरेंद्र गडलिंग देखील आहेत. या संदर्भात त्यांचा खटला विशेष न्यायालयात सुरू आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणांमध्ये एकूण अनेक आरोपी आहेत. त्यापैकी इतर आरोपींमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर देखील आरोप आहेत.

हेही वाचा:

  1. 'लिव्ह इन रिलेशनशिप' एक आजार; त्याला वेळीच आळा घाला, भाजपा खासदाराची मागणी
  2. अवकाळीने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान; नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी हवेत 62 कोटी
  3. नवाब मलिक अजित पवार गटात! मलिकांची विकासाला साथ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.