ETV Bharat / state

नवाब मलिक अजित पवार गटात! मलिकांची विकासाला साथ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 7:16 PM IST

Nawab Malik joined Ajit Pawar Group : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या भूमिकेकडं सर्वांच लक्ष होतं. मलिक कोणाला पाठिंबा देणार याबाबत सगळीकडं चर्चा रंगल्या होत्या.

winter session 2023
winter session 2023

मुंबई Nawab Malik joined Ajit Pawar Group : महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज नागपुरात सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाला पाठिंबा देतात, याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागली होती.

सस्पेन्स कायम होता : दाऊदचे सहकारी सलीम पटेल तसंच हसीना पारकर यांच्यासोबत गोवावाला कपाऊंड जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. नवाब मलिक एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक नागपुरात आहेत. आज ते कोणाच्या गटात जाणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र मलिक आज अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन बसले. त्यामुळं नवाब मलिक आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे.

मलिक सत्ताधारी बाकावर विराजमान : राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड करून अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज सकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपैकी एकाही गटाला पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. मात्र, आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानं चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे. यामुळं विधानसभेतील विरोधी पक्षाच्या आमदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विकासाला पाठिंबा : नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात उपस्थित आहेत. नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानं अजित पवारांच्या गटात असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलंय की, मलिक यांचा विकासाला पाठिंबा आहे. त्यामुळं ते अजित पवार गटात सामील झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.

काय म्हणाले अनिल पाटील? : “नवाब मलिक कोणासोबत आहेत याचा खुलासा नवाब मलिक स्वतः करतील. तसंच मलिक कुणाच्या बाजूनं आहेत हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतील. तुम्ही बघाच नवाब मलिक सत्ताधारी बाकावर सभागृहात जाऊन बसतील, त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. राष्ट्रवादीचे प्रमुख प्रतोद म्हणून मी 23 नोव्हेंबरला अर्ज केला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आम्हाला विधिमंडळात कार्यालय दिलं', असं अनिल पाटील म्हणाले. “आमच्यात कोणताही दुफळीचा मुद्दा नाही कारण राष्ट्रवादी आमची आहे, असा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे अजित पवार यांनी पत्रक काढून नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.




हेही वाचा -

  1. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक बॅकफूटवर, सत्ताधाऱ्यांची 'ही' खेळी चर्चेत
  2. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार करणार मदत, देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनात आश्वासन
  3. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक; विधानसभेच्या पायऱ्यांवर गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून आंदोलन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.