ETV Bharat / state

प्रॉडक्शन डिझायनरला ब्लॅकमेल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी केली अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:46 PM IST

Mumbai Crime News
ब्लॅकमेल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी केली अटक

Mumbai Crime News : मुंबईत अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, प्रॉडक्शन डिझायनरला (Production Designer) ब्लॅकमेल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) अटक केली आहे.

मुंबई Mumbai Crime News : 29 वर्षीय प्रॉडक्शन डिझायनरला ब्लॅकमेल करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ झाकीर खान असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे पोलिसांच्या ताब्यात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमागे ब्लॅकमेलच्या माध्यमातून खंडणी उकळणारी टोळी असल्याचं वांद्रे पोलिसांनी सांगितलं. या टोळीतील इतर साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

व्हिडीओ शेअर करण्याची दिली धमकी : अधिक माहिती देताना वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) सांगितलं की, तक्रारदार त्याच्या आईसोबत वांद्रे येथे राहतो आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम करतो. 20 सप्टेंबरला तो सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहत होता. यावेळी त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनुष्का शर्मा नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही विनंती स्वीकारल्यानंतर त्यांनी चॅटिंग सुरू केले. दरम्यान, दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले होते. व्हाट्स ऍपवर चॅट दरम्यान तिने त्याला व्हिडिओ कॉल केला होता. हा कॉल आल्यानंतर त्याला समोर एक विवस्त्र महिला दिसली. त्यावेळी तक्रारदार खूप घाबरला आणि त्याने कॉल बंद केला. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीने त्याला एक मॉर्फ केलेला व्हिडिओ पाठवला. ज्यामध्ये तक्रारदार देखील नग्न अवस्थेत दिसत होता. हा व्हिडीओ मित्रांना सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

वांद्रे पोलिसांनी केली अटक: बदनामीच्या भीतीने त्याला ४१ हजार रुपये पाठवले होते. तरीही अज्ञात कॉलर तक्रारदाराला ब्लॅकमेल करून आणखी पैशांची मागणी करत होता. या घटनेनंतर तक्रारदाराने वांद्रे पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संविधान कायदा खंडणीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वांद्रे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. दोन महिन्यांच्या तपासानंतर संशयित आरिफ खान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचा या गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला. त्यामुळे त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपीकडे चौकशी केली असता ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागणारी ही टोळी असल्याचे उघड झाले असून या टोळीने आतापर्यंत अनेक गुन्हे केले आहेत.



हेही वाचा -

  1. Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमाचा बलात्कार; फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे
  2. Baramati Crime News : महिलेवर बलात्कार करत उकळले पैसे; पीडितेच्या पतीलाही ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा
  3. Jayant Patil On Ramesh Kadam : शरद पवार ब्लॅकमेल प्रकरण; रमेश कदम कशाच्या आधारे आरोप करतात माहिती नाही, जयंत पाटलांनी केलं स्पष्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.