ETV Bharat / state

Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका

author img

By

Published : Jul 12, 2023, 5:38 PM IST

शिवसेना पक्षात ऐतिहासिक फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन एक वर्ष उलटले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र, अद्यापही खातेवाटप न झाल्याने महायुतीत सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना पक्षात ऐतिहासिक फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपमध्ये दाखल झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

खाते वाटप कधी होणार : अजित पवार यांच्यासह इतर आठ सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही खाते वाटप झाले नसल्यामुळे महायुतीत सर्वच काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना निवासस्थान, कार्यालय वाटपाबाबतचे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले असून खाते वाटप कधी होणार याबाबत चर्चा रंगत आहे.



खाते वाटप दिल्ली दरबारी : गेल्या तीन दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा बैठका झाली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यावी, तसेच शिवसेना-भाजप मंत्र्यांची खात्यांची खांदेपलट करावी का? यावर चर्चा केली जात असल्याचे समजते आहे.

खाते वाटपासंदर्भात दिल्लीत चर्चा : महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. अर्थखाते पुरेसा निधी देत नसल्यामुळे अजित पवारांना लक्ष्य करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अर्थ खात्यावर एकमत होत नसल्याचे बोलले जाते आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तिघेही मंत्रिमंडळ खाते वाटपासंदर्भात दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, शिंदे-फडणवीस काही मंत्र्यांची खाते बदल होणार आहे.

देवगिरी बंगला केंद्रस्थानी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर पवार गटातील मंत्र्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री संजय बनसोडे यांच्यात बैठक झाली आहे.


सरकार मंत्रिमंडळ विस्तारात गुंग : राज्यातील युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर आता महायुतीचे सरकार राज्यात काम करत आहे. अजित पवार आणि त्यांच्या आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊनही खाते दिले नसल्यामुळे विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटप करून दाखवा न्याय द्यावा. ज्यांना मंत्रिपदाची आशा दाखवून त्यांना पक्षातून फोडले. आपल्यासोबत घेऊन गेले. शिवसेना सोडून गेलेल्यांची अशीच परिस्थिती झाली आहे. भाजपमध्ये देखील हीच परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. अनेक ठिकाणी दुबारा पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. मात्र, सरकार मंत्रिमंडळ विस्तारात गुंग आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Devendra Fadnavis: गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून डीलिंग सुरू, संजय राऊतांच्या नव्या आरोपाने खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.