ETV Bharat / state

High Court: मंदिर परिसरात गांजाची शेती करणाऱ्या उच्च न्यायालयाकडून पुजाऱ्याला जामीन

author img

By

Published : Nov 18, 2022, 10:21 AM IST

High Court
High Court

High Court: मंदिर परिसरात गांजाची शेती केल्याचा आरोप असलेल्या मंदिरातील पुजाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. गांजा जप्त करण्यात आला असुन ती जागा पुजाऱ्याच्या मालकी हक्काची नव्हती, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

मुंबई: मंदिर परिसरात गांजाची शेती केल्याचा आरोप असलेल्या मंदिरातील पुजाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गांजा जप्त करण्यात आला असुन ती जागा पुजाऱ्याच्या मालकी हक्काची नव्हती, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी पुजाऱ्याची सुटका केली आहे.

ठोबळे यांना अटक: पुण्यातील शिरूर येथील पोलिसांनी मंदिराच्या पुजारी शांताराम ढोबळे यांच्याकडून 10 किलोग्राम गांजा जप्त केल्याचा दावा केला. त्याशिवाय मंदिरालगतच्या जमिनीवर गांजाच्या झाडांची लागवड केली जात असल्याचे आढळून आल्याचे सांगत पोलिसांनी ठोबळे यांना अटक केली. त्याविरोधात ढोबळे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली आहे.

गांजाची लागवड केल्याचे आढळले: जप्त करण्यात आलेला गांजा हा गैरव्यावसायिक प्रमाणात होता. त्यामुळे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स एनडीपीएस कायद्याच्या कलम 37 ची कठोर कलम येथे लागू होणार नाही. तसेच ज्या जमिनीवर गांजाची लागवड केल्याचे आढळून आली आहे. ती जागा संपूर्ण गावाची असून केवळ पुजाऱ्याच्या खासगी मालकीची नाही, असा युक्तिवाद ढोबळे यांचे वकील अ‍ॅड. मिथिलेश मिश्रा यांनी केला.

जामीन मंजूर: त्यांची बाजू ग्राह्य धरत ज्या मंदिर परिसरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. ती जागा अर्जदाराच्या मालकीची नव्हती किंवा मंदिर हे सार्वजनिकरित्या भाविकांसाठी खुले असल्यामुळे संपूर्ण मंदिराचा ताबा पुजाऱ्याकडे होता, असंही म्हणता येणार नाही. असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अर्जदारास दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.