ETV Bharat / state

Bacchu Kadu Protest :...अन्यथा गणपती मंडळांसमोर 'तेंडुलकर दानपेटी' सुरू करणार; बच्चू कडूंचा मास्टर ब्लास्टरला इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:08 AM IST

Updated : Aug 31, 2023, 12:45 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Bacchu Kadu Protest at Sachin Tendulkar House : आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. याप्रकरणी आमदार कडू यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Sachin Tendulkar Online Gaming Promotion) (Bacchu Kadu on Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकरच्या घरासमोर बच्चू कडूंचं आंदोलन

मुंबई - Bacchu Kadu Protest at Sachin Tendulkar House : बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सचिन तेंडुलकरनं 'भारतरत्न' परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. तेंडुलकरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत. वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. (Sachin Tendulkar Online Gaming Promotion) (Bacchu Kadu on Sachin Tendulkar)

देशातील अनेक तरुण ऑनलाईन गेमच्या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडतायत. सचिन तेंडुलकर 'भारतरत्न' नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. 'भारतरत्न' असलेले तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्यामुळं जाहिरात करणं बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा, तसं न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात गणपती मंडळांजवळ सचिन तेंडुलकरांना पैसे देण्यासाठी 'तेंडुलकर दानपेटी' लावण्यात येईल - बच्चू कडू, आमदार, प्रहार संघटना

बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल - मुंबईतील सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आज (31 ऑगस्ट) 'प्रहार' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच या सर्व कार्यकर्त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं होतं. तर पोलीस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. तसेच 'प्रहार' संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आंदोलनाचा दिला होता इशारा - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं 'ऑनलाइन गेम'च्या जाहिरातीतून माघार घ्यावी, उलट त्यानं त्याचा विरोध करावा नाहीतर आंदोलन करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला होता. 'ऑनलाइन गेम'मुळे अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या. तेंडुलकरनं जाहिरात बंद केली नाही तर यासाठी वकिलाची नियुक्ती करू. त्यासाठी न्यायालयात जाऊ, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला होता.

सचिन तेंडुलकरला विनंती - 'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त सचिन तेंडुलकरनं 'ऑनलाइन गेम'ची जाहिरात करणे चुकीचं आहे. या गेमच्या नादात अनेकांचे जीव गेलेत. 'भारतरत्न' असलेल्या सचिन तेंडुलकरनं याबाबत त्याची भूमिका स्पष्ट करावी, सचिन तेंडुलकर हा या भारताचा अभिमान आहे. त्यामुळे त्यानं 'ऑनलाईन गेम'च्या जाहिरातीमधून माघार घ्यावी, नागरिकांचे बळी घेणाऱ्या 'ऑनलाइन गेम'वर बंदी घालण्यासंदर्भात सचिन तेंडुलकर यांनी सुचवावे, अशी विनंतीही बच्चू कडू यांनी केली होती.

हेही वाचा -

  1. Bacchu Kadu Warning Tendulkar : ऑनलाईन गेमची जाहिरात करुन सचिन तू चुकलास, जाहिरात करणे थांबवावे; अन्यथा... - बच्चू कडूंचा इशारा
  2. Sachin Tendulkar Fan: सचिनप्रेमी गोळा विक्रेत्याने राज्याच्या भावी मुख्यमंत्री पदासाठी सुरू केली जनमोहीम; वाचा 'हा' खास रिपोर्ट
  3. Bacchu Kadu On Ambadas Danve: '...तेव्हा अंबादास दानवेंचा जन्मही झाला नसेल'
Last Updated :Aug 31, 2023, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.