ETV Bharat / state

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

author img

By

Published : Aug 10, 2021, 4:21 PM IST

Updated : Aug 10, 2021, 4:49 PM IST

डॉ. बालाजी तांबे
डॉ. बालाजी तांबे

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात व नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मुंबई - आयुर्वेदाचार्य डॉ.बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. आयुर्वेद व रोजच्या जगण्यात आहार, विचारांच्या संतुलनाबाबत आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे सतत मार्गदर्शन करत असत. त्यांच्या निधनामुळे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तांबे यांना श्रद्धांजली वाहिली.

आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक

आयुर्वेद व योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनीही वाहिली श्रद्धांजली

बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या. आयुर्वेदाचार्य तांबे यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - 'निर्बंध शिथिल मात्र आता जबाबदारी वाढली'

Last Updated :Aug 10, 2021, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.