ETV Bharat / state

Ashok Chavan On Kirit Somaiya : किरीट सोमैया यांच्या कथित व्हिडिओची चौकशी करा - अशोक चव्हाण

author img

By

Published : Jul 18, 2023, 7:03 PM IST

किरीट सोमैया यांचे कथित व्हिडीओ प्रकरण गंभीर असून राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. येत्या काळात किरीट सोमैया यांचे आणखी काही व्हिडिओ समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Chavan On Kirit Somaiya
Ashok Chavan On Kirit Somaiya

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई : विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमैयांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन राज्यभरात विविध ठिकाण विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच या घटनेचे विधिमंडळात देखील पडसाद उमटले आहेत. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही टीका केली. सोमैयांचे प्रकरण अतिशय गंभीर असून राज्य शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली केली आहे. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.


सोमैयांना राज्याबाहेर काढा : राज्यातील विरोधी पक्षांचे कर्दनकाळ ठरलेले माजी खासदार, भाजपचे नेते किरीट सोमैया यांचा एका कथित व्हिडीओ व्हायरल झाला. राज्यभरात सोमैयांच्या विरोधात तीव्र मोर्चे, आंदोलन सुरु झाली आहेत. घाणेरडे चाळे करणाऱ्या किरीट सोमैयांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याचे नारे विरोधकांनी देण्यास सुरवात केली आहे. तसेच या घटनेचा विरोधकांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. विधिमंडळातही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. सत्तेला पाठिंबा देणारे घटक पक्ष वगळता सोमैयांनी विरोधकांवर अनेकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती करुन अडचणीत आणले आहे. मात्र, व्हायरल व्हिडीओची संधी चालून येताच, विरोधकांनी सोमैयांची कोंडी केली आहे. सरकारने सोमैयांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

​​

सरकारची मराठा आरक्षणाबाबत भूमिका : यावर कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. सोमैयांचे प्रकरण गंभीर आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. नांदेडमधील एक गृहस्थ आज उपोषणाला बसले आहेत. नवीन सरकारची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे? केंद्र आणि राज्य सरकार काही निर्णय घेईल का? उपोषणाला बसलेल्या व्यक्तीचे उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकार काही करणार आहे का? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी सरकरवर उपस्थित केले आहेत. त्या गृहस्थाचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी तिकडे जाईल, असे आश्वासन सरकारने दिल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणी विरोधक आक्रमक; 'दलाल महाराष्ट्रात महिलांवर...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.