ETV Bharat / state

Arthur Road Jail: आर्थर रोड कारागृहच गुन्हेगारी कारवायांचा बनतेय अड्डा

author img

By

Published : Dec 7, 2022, 8:04 PM IST

कुख्यात गुन्हेगारांचे शिक्षा भोगण्याचे स्थान अशी मुंबईतील ऑर्थर रोड जेलची (Arthur Road Jail) ओळख आहे. अरुण गवळी गॅंगचे गुंड, छोटा शकील इतकेच काय तर अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचे गुंडही येथे शिक्षा भोगत (Arthur Road Jail crime Spot) आहेत. मागील काही वर्षांमध्ये अंडासेल सेक्शनमधील कैद्यांकडे मोबाईल फोन सापडल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ माजली होती (Latest news from Mumbai). केवळ यासाठीच नव्हे तर अन्य मोठ्या गुन्हेगारी (Mumbai Crime) घटनांसाठी ऑर्थर रोड जेल कुप्रसिद्ध आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी...

Arthur Road Jail
आर्थर रोड कारागृह

मुंबई : चिंचपोकळी परिसरातील आर्थर रोड कारागृह (Arthur Road Jail) हे मुंबईतील एक मोठे कारागृह आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळी, छोटा राजन टोळी, गवळी टोळी तसेच वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांतील आरोपी या कारागृहात शिक्षा भोगत (Arthur Road Jail crime Spot) आहेत. मोठ्या गुन्हेगारांना अंडा सेलमध्ये ठेवले जाते. (Latest news from Mumbai) अंडा सेल हा कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याच अंडा सेलमध्ये तसेच इतरत्र मोबाईल सापडले आहेत. कारागृह प्रशासनाने ते ताब्यात घेतले. (Mumbai Crime) यावरून आर्थर रोड कारागृहच गुन्हेगारी कारवायांचा अड्डा बनत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तुरुंगात अंमली पदार्थांची पिशवी आढळली : आता तर आर्थर रोड कारागृहात चक्क अंमली पदार्थ असलेली पिशवी आढळल्याने खळबळ माजली आहे. ही पिशवी खरेच बाहेरून कोणी फेकली की, कोणत्या कैद्याने ती आणली याचा तपास एन एम जोशी पोलीस करत आहेत. एकूण आर्थर रोड कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांची मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घ्यायला हवी. कारण याआधी देखील आर्थर कारागृहात कधी पैशाची तस्करी तर कधी हाणामारी आणि खूनही झाले. त्यामुळे खाकीचा वचक या गुंडांवर असायला पाहिजे. याआधी आर्थर रोड कारागृहात कधी कधी गुन्हे घडले ते पाहुयात.

आर्थर रोड कारागृहात आरोपीला मारहाण : आर्थर रोड कारागृहातील कैद्यांनी मारहाण केल्याचा आरोप कारागृहातील एका कैद्याने केला होता. त्याला उपचारासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले होते. इंद्रपाल सिंह मारवाह हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा उपाध्यक्ष असून त्याला खंडणी प्रकरणात अ‍ॅँण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली होती. आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना काही कैद्यांनी २० जून २०१४ला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला. मारवाहला अंतर्गत इजा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते.


सापडले ४० मोबाईल फोन्स : २०१४ मध्ये मुंबईच्या आर्थर रोड परिसरातील मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांजवळ ४० मोबाईल फोन आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने पोलिस प्रशासन हादरून गेले होते. त्यामुळे या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर या प्रकारामुळे गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.


अबू सालेमचा साथीदार हसन मेहंदीवर हल्ला : २०१० मध्ये अबू सालेमचा साथीदार हसन मेहंदी याच्यावर मुंबईतील अतिसुरक्षित असलेल्या आर्थर रोड जेलमध्ये टोळीयुद्धात दुसऱ्या गॅंगच्या चार सदस्यांनी हल्ला केला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडवपुत्र टोळीच्या चार सदस्यांनी एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा जवळचा साथीदार मानल्या जाणाऱ्या हसन मेहंदीवर जेलच्या आवारात हल्ला केला होता. मेहंदी हा अबू सालेमचा ड्रायव्हर म्हणूनही काम करत होता. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला, डोळ्याला आणि हाताला जखमा झाल्या. त्याला जेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बिल्डर प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी मेहंदी हा सहआरोपी होता असून त्याला २००५ मध्ये अटक करण्यात आली होती.


स्लिपमधून पैशाची तस्करी : २०१३ मध्ये आर्थर रोड तुरुंगात दाखल केलेल्या अंडरट्रायल कैद्याने स्लिपरच्या तळव्यात लपवून २ लाख रुपये जलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तुरुंगातील दोन सतर्क सुरक्षा रक्षकांनी त्याचा हा डावपेच मोडून पाडला. सुरक्ष रक्षकांना कैद्याची चप्पल नेहमीपेक्षा जाड असल्याचे पाहून त्याला पकडले. मेहेंदी शेख उर्फ बंगाली बाबा (३९) याला 2010 मध्ये दक्षिण मुंबईतील एका कुटुंबातील सात मुलींवर अनेक महिन्यांत बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 20 एप्रिल २०१३ला शेखने सत्र न्यायालयात सुनावणीसाठी कारागृहातून बाहेर सोडले होते. मात्र, तो परत आल्यावर सुरक्षा रक्षकांना त्याची चप्पल सुनावणीसाठी निघताना त्याने घातलेल्या चप्पलपेक्षा वेगळी असल्याचे आढळले होते. चप्पलचा तळवा विलक्षण जाड होता यावरून त्यांच्या संशय अजून बळावला. त्यानंतर शेखला पादत्राणे काढण्यास सांगितले. त्यावेळी तपासणीत सुरक्षा रक्षकांना तळव्यावर टाके घातल्याचे दिसून आले. ते टाके उघडले तेव्हा आम्हाला प्रत्येक चप्पलमध्ये एक - एक लाख रुपये लपवून ठेवलेले आढळले.


१६ मे २०२२ मध्ये अनैर्सगिक अत्याचार : आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलिसांनी कलम 377, 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती .


अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्या मारामारी : २०१३ मध्ये अबू सालेम आणि तुरुंगात असलेला गुंड मुस्तफा डोसा हे दोघे तुरुंगातील वर्चस्वाच्या लढाईत आर्थर रोड तुरुंगात भिडले. या संघर्षामुळे अधिकाऱ्यांना सालेमला तळोजा आणि डोसाला ठाणे कारागृहात हलवण्यास भाग पाडले. त्यानंतर डोसाची पुन्हा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तर २००६ मध्ये आर्थर रोड तुरुंगात चार जणांनी गुंड जॉन डिसूझाची चमच्यासारख्या धारदार ब्लेडने हत्या केली होती. या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.