ETV Bharat / state

Sachin Vaze Medical Treatment : सचिन वाझे यांची मोतीबिंदू उपचाराकरिता मुंबई सत्र न्यायालयात मागणी

author img

By

Published : Nov 2, 2022, 9:01 PM IST

सचिन वाझे (Suspended police officer Sachin Vaze) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला असल्याने उपचाराकरिता परवानगी (Sachin Vaze allowed for cataract treatment) देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर कारागृह प्रशासन आणि राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने दिले आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. (Sachin Vaze Medical Treatment)

Sachin Vaze Medical Treatment
सचिन वाझे

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटके तथा मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Suspended police officer Sachin Vaze) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला असल्याने उपचाराकरिता परवानगी (Sachin Vaze allowed for cataract treatment) देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर कारागृह प्रशासन आणि राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने दिले आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. (Sachin Vaze Medical Treatment)

न्यायालयाची वाझेंना विचारणा- सचिन वाझे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरसीच्या माध्यमातून प्रत्यक्षात हजर होते. न्यायालयाने कारागृह प्रशासनाला वाजे यांच्या मागणी बाबत विचारणा केली. तसेच गार्ड व गाडीचे कारण न देता वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले आहे.


काय आहे प्रकरण - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.

मनसुख हिरेन हत्या प्रकरण- मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.