ETV Bharat / state

APMC Public Toilet Scam: 'एपीएमसी' घोटाळ्यामुळे राज्याचं ७.६१ कोटीचं नुकसान; माजी मंत्री शशिकांत शिंदेंसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 5:31 PM IST

APMC Public Toilet Scam
एपीएमसी

APMC Public Toilet Scam: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणी माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे (Agriculture Produce Market Committee) यांच्यावर एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं. (Former Water Resources Minister Shashikant Shinde) घोटाळ्यामुळे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा आहे. नवी मुंबई पोलिसांकडून एपीएमसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला. (Case Filed Against Shashikant Shinde)

नवी मुंबई APMC Public Toilet Scam: माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात आजी माजी 'एपीएमसी' अधिकाऱ्यांवर शौचालय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालायं. यामध्ये रवींद्र आनंदराव पाटील (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), सिताराम कावरखे (सेवानिवृत तत्कालीन उपसचिव), जी. एम. वाकडे (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), विजय पद्माकर शिंगाडे (उपसचिव एपीएमसी), सुदर्शन पांडुरंग भोजनकर (उपअभियंता, एपीएमसी), राजेंद्र झुंजारराव (कनिष्ठ अभियंता, एपीएमसी), विलास पांडुरंग पवार (कार्यालयीन अधीक्षक, बाजार समिती) यांचा समावेश आहे. या आठ जणांनी मिळून वेळोवेळी कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून 'एपीएमसी'साठी नुकसानदायक निर्णय घेतले.

स्वच्छतागृहाच्या व्यवहारात लबाडी: या आठ जणांनी कायदेशीर कर्तव्ये पार न पाडता समितीच्या गरजेचे आणि हिताचे कायदेशीर करार केले नाहीत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार येथील स्वच्छतागृहाच्या व्यवहारात लबाडी केली. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून २०१७ पूर्वी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबविली नाही. सन २०१७ ते २०१८ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार सुरेश मारु यांच्या सोबत असणाऱ्या हितसंबंधामुळे त्यांच्याशी संबधित संस्थांना फायदा होण्याकरिता नियमबाह्य पध्दतीनं ही स्वच्छतागृहं भाडेतत्त्वावर दिली.


पोलिसांनी केला गुन्हा नोंद: माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह उर्वरित सात जणांनी १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०२१ कालावधीतही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व नियम पायदळी तुडवले. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाशी लागेबांधे असणाऱ्या मारू सेवा संघ, विकास कन्स्ट्रक्शन्स, अमोल कन्स्ट्रक्शन्स, भूमी कन्स्ट्रक्शन्स या संस्थांना बेकायदेशीरपणे वाटप केले. शासनाचे उपसचिव रवींद्र औटे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना याविषयी कळवले आणि चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल मेहुल यांनी चौकशी करून ९ ऑगस्ट २०२३ ला गृहविभागाकडे त्यांचा अहवाल पाठविला होता. संबधित अहवाल शासनाने पणन संचालकांना पाठविला. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी माजी आमदार शशिकांत शिंदे आणि उर्वरित सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:

  1. Passport Temple in Kerala : केरळात आहे सरस्वतीचे अनोखं 'पासपोर्ट मंदिर', जाणून घ्या मंदिराची खासियत
  2. Diwali 2023 : राजकारणातील 'कारीट' नंतर फोडणार आज फक्त. . , अनिल परब यांनी सूचक इशारा देत दिल्या शुभेच्छा
  3. Mega Block Update : मुंबईकरांना रेल्वेचं दिवाळी 'सरप्राईज'; आज होणारा मेगाब्लॉक रद्द
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.