ETV Bharat / state

Anil Deshmukh : परमबीर सिंह यांनी सरकारची दिशाभूल केली, चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांचे प्रतिज्ञापत्र

author img

By

Published : Jan 25, 2022, 9:23 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

महाराष्ट्र एटीएसने अँटिलिया प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या आणि निर्णायक बाबी समोर आल्या आहेत. ज्याची माहिती एटीएसने महाराष्ट्र सरकारला दिली होती. एटीएसच्या तपासात जी माहीती समोर आली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांची होमगार्डच्या महासंचालकपदी बदली केली होती. त्यानंतर त्यांनी 20 मार्च, 2021 रोजी संपूर्ण श्रेय देऊन दुर्भावनापूर्ण पत्र लिहिले, असे प्रतिज्ञापत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Farmer Home Minister Anil Deshmukh ) यांनी चांदीवाल आयोगाला ( Chandiwal Commission ) दिले.

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांनी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) सुरू असलेल्या चौकशी दरम्यान परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांच्या संदर्भातील 'परम'सत्य रेकॉर्डवर आणण्यासाठी मला काही गोष्टी आयोगासमोर सांगायचे आहे. त्या सांगण्याची विनंती आयोगाला केली होती. आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याबाबत सांगितले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी वकिलामार्फत चांदीवाल आयोगासमोर आज (दि. २५ जानेवारी) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण ( Antilia Bomb Case ) आणि त्यानंतर मनसुख हिरेन ( Mansukh Hiren Murder Case ) यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्या ब्रीफिंगमध्ये महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केली होती, असे देशमुख म्हणाले.

‘ते’ कधीतरी रेकॉर्डवर आणले पाहिजे - आपल्याला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने ( Anti Terrorist Squad ) तयार केलेली कागदपत्रे हवे होते. त्यांनी काही कागदपत्रे गोळा केली आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांसमोर हजर केले. संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे, ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर येईल, असे अनिल देशमुख यांचे प्रतिनिधित्व करणारे अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाला सांगितले. मी गृहमंत्री असताना एटीएसने गोळा केलेली काही कागदपत्रे आम्हाला दिली होती. सिंह कशी दिशाभूल करत होते. हे कधीतरी रेकॉर्डवर आणले पाहिजे. म्हणून मी आज आयोगाला हे सांगत आहे. साक्षीदार म्हणून उभे असताना अनिल देशमुख यांनी आयोगाला सांगितले.

…म्हणून केली होती परमबीर सिंह यांची बदली - देशमुख यांच्या अर्जात असे म्हटले होते की, एटीएसने अँटिलिया प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या आणि निर्णायक बाबी समोर आल्या आहेत. ज्याची माहिती एटीएसने महाराष्ट्र सरकारला दिली होती. एटीएसच्या तपासात जी तथ्ये समोर आली होती त्यात वस्तुस्थिती उघड होईल. एटीएसच्या तपासामुळे महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांची होमगार्डच्या महासंचालकपदी बदली केली होती. त्यानंतर त्यांनी 20 मार्च, 2021 रोजी संपूर्ण श्रेय देऊन दुर्भावनापूर्ण पत्र लिहिले. बदला म्हणून त्या पत्रात बोगस आरोप केले, असे देशमुख यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

अर्ज बदलण्यास आयोगाने सांगितले - परमबीर सिंह यांचे वकील अ‌ॅड. अनुकुल सेठ यांनी देशमुख यांच्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या काही परिच्छेदांवर आक्षेप घेतला आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी कुलकर्णी यांना परमबीर सिंह यांच्यावर विविध आरोप लावणारा अर्ज बदलण्यास सांगितले. त्यानंतर मला या सर्व पॅरासह नव्हे तर स्पष्ट शब्दांत अर्ज द्या, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले. सेठ आणि वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी या अर्जाला विरोध केला.

पुढील सुनावणी 3 फेब्रुवारीला - न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आयोगाच्या रजिस्ट्रार यांना एका आठवड्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यास सांगितले. गरजेनुसार संबंधित साक्षीदारांना परत बोलावण्याचा संबंधित पक्षांचा अधिकार खुला ठेवण्यात आला आहे. आयोगाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.