ETV Bharat / state

Anand Mahindra tweet : आनंद महिंद्रांकडून 'त्या' वेटरचे कौतूक, म्हणाले हा तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा दावेदार...

author img

By

Published : Feb 1, 2023, 11:28 AM IST

Updated : Feb 1, 2023, 11:40 AM IST

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत एका वेटरच्या कौशल्याचे कौतूक केले आहे. तब्बल 16 डोसा प्लेट हातात घेऊन जातानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. वेटरच्या हातांचा समतोल पाहण्यासारखा होता. भुकेल्या ग्राहकांना गरम डोसा देताना वेटर दिसत आहे.

Anand Mahindra tweet
आनंद महिंद्रा ट्विट

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा दावेदार असता

मुंबई : सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ कुठला आहे हे सध्या समजू शकलेले नाही. मात्र एखादा वेटर एकाच वेळी इतक्या प्लेट कशा उचलू शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल 16 प्लेट डोसा हा वेटर घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओला 38 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत एका वेटरच्या कौशल्याचे कौतूक केले आहे.

हातांचा समतोल साधला : या वेटरच्या प्रोडक्टिव्हिटीला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळायला हवी. हा व्यक्ती त्या स्पर्धेत सुवर्णपदकांचा दावेदार असेल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शेफ डोसा तयार झाल्यावर एका स्टीलच्या प्लेट्समध्ये डोला देत आहे. त्यानंतर तो वेटर सर्व प्लेट्स उचलतो. मात्र, सामान्य वेटरसारखा तो एकाच वेळी एक प्लेट घेऊन जात नाही. तर तब्बल 16 प्लेट डोसा घेऊन तो जात होता. एका हातात त्यांचा समतोल साधला. आनंद महिंद्रा वेटरच्या कौशल्याने खूप प्रभावित झाले.

16 प्लेट घेऊन गेला : वेटर केवळ दोन-तीन प्लेट्सवर न थांबता एका हातात अक्षरशः 16 प्लेट घेऊन गेला. 2 मिनिटांच्या क्लिपमध्ये तो नंतर भुकेल्या ग्राहकांना गरम डोसा देताना दिसतो आहे. आपल्याला ‘वेटर प्रोडक्टिव्हिटी’ला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळायला हवी. हा गृहस्थ त्या स्पर्धेत सुवर्णपदकांचा दावेदार असेल,” महिंद्राने पोस्टला कॅप्शन दिले आहे.

40 हजार डॉलर्स नेण्याचा प्रयत्न : उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर सतत कर्तबशील कामांची प्रशंसा करत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोलकाता एअरपोर्टवर स्मगलिंगच्या उद्देशाने एका प्रवाशाला पकडण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रवाशी 40 हजार डॉलर्स पान मसाला पुडिंगमध्ये लपवून नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, विमानतळावर तो पकडला गेला. प्रवाशाची ही इनोव्हेटीव्ह आयडिया पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले . अनेकदा ते लोकांना आपल्यातील क्रिएटीव्हीचा वापर योग्य दिशेने देण्याचाही सल्ला देत असतात.

इडली अम्माला नवीन घर भेट : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी याआधी इडली अम्माला तिचे नवीन घर भेट दिले आहे. नवीन घर मिळाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी इडली अम्माला त्याबाबतचे वचन दिले होते. मदर्स डेच्या दिवशी त्यांनी ते पूर्ण झाल्याचे ट्विट केले. व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले होते की, 'मदर्स डेनिमित्त इडली अम्माला भेट देण्यासाठी वेळेत घराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे खूप खूप आभार. इडली अम्मा यांना आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे भाग्य लाभले. असे त्यांनी म्हटले होते. यासोबतच त्यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा : Budget 2023 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर होणार

Last Updated : Feb 1, 2023, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.