ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा अटकेत; कोण आहे डिझायनर आणि अनिल जयसिंघानी?

author img

By

Published : Mar 16, 2023, 4:49 PM IST

Updated : Mar 16, 2023, 10:54 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी डिझायनरला उल्हासनगरनगरमधुन ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अनिक्षा जयसिंघानिया यांच्या उल्हासनगरमधील घरावर पोलिसांनी छाप ठाकला होता. इंटरनॅशनल प्रसिद्ध बुकी असलेल्या अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केले होते. त्याविरोधात पोलिसांनी अनिक्षाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अनिक्षा जयसिंघानीचे वडील गेल्या ८ वर्षापासून पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis

Devendra Fadnavis

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी डिझायनर उल्हासनगर शहरात राहणारी आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुकी अनिल जयसिंघानी यांच्या मुलीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. अनिक्षा जयसिंघानी असे तीचे नाव असून तिचे वडील गेल्या 8 वर्षांपासून फरार आहेत. या प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच जयसिंघानी यांच्या उल्हासनगरमधील राहत्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहे.

अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे दाखल - मुंबई पोलिसांचे पथक उल्हासनगर शहरातील अनिक्षाच्या घरात दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी अनिक्षा, तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 120-बी ( षड्यंत्र ) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

  • #UPDATE | Mumbai police arrested the designer Aniksha following a complaint by Amruta Fadnavis, wife of Maharashtra Dy CM Devendra Fadnavis. Police is searching for the second accused (Anil Jaisinghani: Mumbai police pic.twitter.com/O2aMqPMYJA

    — ANI (@ANI) March 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, आरोपींनी पैशांची ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अमृता फडणवीस यांना गुन्हेगारी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची धमकी दिली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. अनिक्षा जयसिघांनी असे आरोपी केलेल्या डिझायनरचे नाव आहे. ती काही काळापासून फडणवीस यांच्या संपर्कात होती. आरोपी अनेकदा फडणवीसांच्या घरीही गेली होती. डिझायनर अनिक्षा अमृता यांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, टेक्स्ट मेसेज पाठवून धमकावत होती.

  • I know ur औक़ात is about switching masters & pulling down honest & independent women.
    Why do u need to ask Miss चतुर pokey nose for an independent investigation-I’m myself demanding for it. Let the truth reg deceit come out to light along with real faces behind this treachery https://t.co/GbbmwsTl5R

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल : पोलिसांनी अनिक्षा, तिच्या वडिलांविरोधात षडयंत्र, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. एफआयआरनुसार, अनिक्षा जयसिघांनी गेल्या 16 महिन्यांपासून अमृता फडणवीसांच्या संपर्कात होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अमृता फडणवीस यांनी सांगितले की, त्या नोव्हेंबर 2021 मध्ये अनिक्षाला पहिल्यांदा भेटल्या होत्या.

उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत: अनिक्षा जयसिघांनी ही कपडे, दागिने, फुटवेअरची डिझायनर आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला तीने तीचे तयार केलेले उत्पादन घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यास मदत होईल, असे मलबार हिल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अमृताला 1 कोटी रुपयांची ऑफर : अधिकाऱ्याने सांगितले की अमृता यांचा विश्वास संपादन केल्यानंतर अनिक्षाने त्यांना पैसे कमवण्याची ऑफर दिली होती. अमृता फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले की ती अनिक्षाच्या वागण्याने त्या नाराज होत्या. त्यांनी अनिक्षाचा नंबर त्यामुळे ब्लॉक केला होता. त्यानंतर महिलेने एका अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीसांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, तसेच अनेक मेसेज पाठवले. त्यांनतर अनिक्षाच्या वडिलांनी अमृता फडणवीसांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली होती असे तक्रारीत म्हटले आहे. एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचण्यात आला होता.

तपास सुरू : शहर पोलिसांनी अनिक्षा तसेच तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अनिक्षा कोण आहे : अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेली आरोपी डिझायनर अनिल जयसिंघानी या टॉप बुकींची मुलगी आहे. अनिक्षा ही कायद्याची पदवीधर आहे. बुकी अनिलवर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममधील सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करणे आदी अनेक आरोप आहेत. या प्रकरणातही अनिक्षाणे स्वत:ची डिझायनर म्हणून ओळख करून दिली आणि तिच्या आईचे निधन झाल्याचे सांगून सहानुभूती मिळवली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे राहणाऱ्या अनिक्षाने अनेकदा अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.

ट्विटर वॉर - डिझायनर लाच व धमकी प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्या ट्विटर वॉर रंगले आहे. प्रियंका चतुर्वैदी यांनेी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी - अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांच्यावर सट्टेबाजीचा आरोप आहे. अनिल जयसिंघानी यांचे नाव दीड दशकांपूर्वी चर्चेत होते. त्यावेळी जयसिंघानी यांनी मुंबईचे माजी डीसीपी जाधव, गुन्हे शाखेने त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायला भाग पाडले आणि कथितरित्या त्यांची मुले आणि पत्नीला ओलीस ठेवले असल्याचा आरोप केला होता. जाधव यांच्यावरील आरोपांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली नाही. जाधव यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी व्हीआरएस घेतली. अशाप्रकारे जाधव यांनी पोलिस विभाग सोडला. जयसिंघानी यांनी आरोप केला की, डीसीपी अमर जाधव यांना एक कोटी रुपये दिले त्यानंतर त्यांनी ओलीस ठेवलेल्या त्यांच्या कुटुंबाला सोडले. विविध गुन्हात फरार असलेला अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला.

हेही वाचा - Amruta Fadnavis Bribe and Blackmail : महाविकास आघाड़ी सरकारच्या काळात माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न - फडणवीस

Last Updated :Mar 16, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.