ETV Bharat / state

Amit Shah to visit Lalbagh Raja: अमित शाह शनिवारी घेणार लालबागच्या राजाचे दर्शन, मुंबईत राजकीय खलबते होणार का?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 10:03 PM IST

Amit Shah to visit Lalbagh Raja गणेशोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत गणपतीची धूमधाम सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.

Amit Shah to visit Lalbagh Raja
Amit Shah to visit Lalbagh Raja

मुंबई Amit Shah to visit Lalbagh Raja : गतवर्षी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यंदाही लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. यंदा शनिवारी ते पुन्हा एकदा लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणार असून त्यांचा मुंबई दौरा ठरला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांनी गतवर्षी पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होत. तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते.


भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार- राज्यात शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत. यंदाही ते लालबागच्या राजाच्या दर्शनाबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मतदारसंघातील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. सोबतच अमित शाह हे भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्या बैठकीला ते संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा 'श्री गणेशा' अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनानंच केला होता.


अजित पवारांची भर- मागील वर्षी अमित शाह हे लालबागच्या चरणी सहकुटुंब दर्शनासाठी आले असता त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे उपस्थित होते. यंदा त्यामध्ये राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भर असणार आहे. नवीन संसदेच्या विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक मांडल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. यादरम्यान ते मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे.


निमित्त राजाच्या दर्शनाचं- ऐन सणासुदीच्या उत्सवात राजकीय स्टंटबाजीसुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोना काळात महायुतीने सणावर लावलेले सर्व निर्बंध मागच्या वर्षीपासून शिंदे - फडणवीस सरकारने हटवले असल्याने मुंबईसह राज्यात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. अशातच शिंदे - फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सत्तेत सामील झाल्यानं हा उत्साह अजून दिसत आहे.

मिशन ४५ टार्गेट आखले - अमित शाह मुंबई लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्तानं येत आहेत. असे असले तरीसुद्धा सध्याच्या राजकीय घडामोडीवर बरीच खलबत्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रात मिशन ४५ टार्गेट आखले आहे. त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अशातच शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल कुठल्याही क्षणी अपेक्षित असल्याकारणाने यावरही या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

हेही वाचा-

  1. Rahul Gandhi on women reservation: महिला आरक्षणात ओबीसींना आरक्षण देण्याची राहुल गांधींची मागणी, अमित शाह म्हणाले...
  2. BJP Holds Crucial Meeting : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकीचा घेणार आढावा
  3. Shilpa Shetty bring Bappa home : शिल्पा शेट्टीच्या घरी गणेश उत्सवाची तयारी, बाप्पाच्या मूर्तीचे घरी आगमन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.