ETV Bharat / state

Ajit Pawar : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई गरजेची - अजित पवार

author img

By

Published : Dec 29, 2022, 1:36 PM IST

ऊस ऊसतोडणी कामगारांसाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी अजित पवारांकडून करण्यात ( Ajit Pawar raised sugarcane farmer issue ) आली. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनात त्यांनी प्रश्न उपस्थित गेला. ऊसतोड मजूरांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे अनेकवेळा पैसे बुडवतात असे त्यांनी ( Demand Action against contractors ) म्हटले.

Ajit Pawar raised sugarcane farmer issue
कंत्राटदारांवर कारवाई गरजेची

कंत्राटदारांवर कारवाई गरजेची

नागपूर : राज्यातील साखर कारखाने, ऊसतोडणी मजूर, ट्र्रॅक्टरद्वारे ऊसवाहतूक करणाऱ्यांची मुकादम आणि कंत्राटदारांकडून आर्थिक फसवणूक केली ( Ajit Pawar raised sugarcane farmer issue ) जाते. अशा कंत्राटदार मुकादमांवर कारवाईसाठी यंत्रणा उभी करण्याचे आश्वासन सरकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिले. ऊसतोडणी काम घेणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांकडून साखर कारखान्यांची शेतमजूरांची, ट्रॅक्टर वाहतूकदार शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा ( Demand Action against contractors ) अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.

ऊसतोड मजूरांचे हाल : राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊसवाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत. उसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजूरांचे, ट्रॅक्टरखरेदी करुन ऊसवाहतूक व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे ( Fraud with sugarcane farmers ) बुडवतात. यामुळे शेतमजूरांवर उपासमारीची, शेतकऱ्यांच्या मुलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उलट कंत्राटदार-मुकादम हेच साखर कारखाने, शेतकऱ्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल करतात. ही अपप्रवृत्ती रोखण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून यंत्रणा निर्माण करण्यात ( Demand form association for sugarcane farmer) यावी. त्यासाठी तात्काळ बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. सहकारमंत्री अतुल सावे यांनी विरोधी पक्षनेत्यांची मागणी योग्य असल्याचे सांगून याप्रश्नी तात्काळ बैठक आयोजित करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

लक्षवेधी उपस्थित केली : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील साखर कारखान्यांची, ऊसउत्पादक शेतकऱ्यांची, ट्रॅक्टरखरेदी करुन वाहतूक व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची, शेतकऱ्यांच्या मुलांची होत असलेल्या फसवणूकीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्याती साखर कारखान्यांचा ऊसतोडणी मजूर पुरवणाऱ्या व ऊसाची वाहतूक करणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांकडून गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. एकाच वेळी अनेक कारखान्यांकडून उचल घेऊन हे मुकादम-कंत्राटदार काम न करता पळून जातात. त्यातून साखर कारखान्यांची आर्थिक फसवणूक होते. शेतकऱ्यांचे नुकसान होते. ऊसतोडणी मजूरांचेही पैस बुडवले जातात. कर्जावर ट्रॅक्टरखरेदी करुन ऊसवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे कर्ज थकते. यातून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सहकारमंत्री अतुल सावे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन आज विधानसभेत दिले.

उच्चस्तरीय आधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. सभागृह सुरू असताना लोकप्रतिनिधीवर 353 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नितीन देशमुख आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना दमदाटी केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय आधिकाऱ्यांमार्फत फेरतपासणी घेण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.