ETV Bharat / state

NCP Political Crisis : अजित पवारांनी तोडला रेकॉर्ड;  जाणून घ्या, आतापर्यंतच्या उपमुख्यमंत्र्यांची लिस्ट

author img

By

Published : Jul 2, 2023, 10:52 PM IST

Updated : Jul 2, 2023, 10:58 PM IST

अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून या निमित्ताने सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री बनण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावार झाला आहे, आतापर्यंत त्यांनी पाचवेळा तर त्यांच्या खालोखाल छगन भुजबळ यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

NCP Political Crisisi
NCP Political Crisisi

मुंबई : मुख्यमंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली असली तरी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यात नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. सर्वात जास्तवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

NCP Political Crisisi
आत्तापर्यंतचे उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी केव्हा घेतली शपथ ? : अजित पवार यांनी सर्वप्रथम १० नोव्हेंबर २०१० रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती ते . २५ सप्टेंबर २०१२ पर्यंत या पदावर कार्यरत होते. तर दुसऱ्यांदाही त्यांनी चव्हाण मुख्यमंत्री असताना शपथ घेतली. २५ ऑक्टोबर २०१२ रोजी ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते.

शपथविधी गाजला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांचा हा शपथविधी खूप गाजला. परंतु, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा परत आणण्यात शरद पवार यशस्वी झाल्यानंतर पुरेशा संख्यबळाऐवजी फडणवीस यांनी आपल्या पदाचा २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिल्यामुळे अजित पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री पद औट घटकेचे ठरले .

उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ३० डिसेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, राज्यात शिवसेनेतून शिंदे गट फुटून भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले. २९ जून २०२२ रोजी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आता शिंदे - फडणवीस सरकारमध्येही त्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची पाचव्यांदा शपथ घेतली आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा - NCP Political Crisisi : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर

Last Updated :Jul 2, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.