ETV Bharat / state

Air India Closed Investigation : एअर इंडियाने "त्या" प्रकरणातील तपास केला बंद; पाहा यावरील स्पेशल रिपोर्ट

author img

By

Published : Jan 24, 2023, 10:11 PM IST

एअर इंडियाच्या AI102 विमानात सहप्रवाशाने लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड व पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला होता. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या कृतीवर आधारित अंतर्गत तपास बंद करण्यात आला आहे. डीजीसीएने कंपनीस सांगितलेल्या कार्यवाहीची दखल घेण्यात आल्याची माहिती एअर इंडिया प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Air India Closed its Investigation into "That" Case Watch the special report on this
एअर इंडियाने "त्या" प्रकरणातील तपास केला बंद; पाहा यावरील स्पेशल रिपोर्ट

मुंबई : एअर इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहकारी प्रवाशाने लघवी केल्याच्या कथित आरोपानंतर तक्रारदाराने मदतीसाठी कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधला होता. कोणत्याही साक्षीदाराच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी दर्शनी परिस्थितीनुसार तक्रारदाराचा आरोप ऐकून घेतला. त्यांना नवे कपडे पुरवत सामान स्वच्छ करण्यासाठी मदत केली.

केबिन कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कमांडरला दिली माहिती : त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मूळ सीटसारखी दुसरी सीट बिझनेस क्लासमध्ये पुरवली होती. केबिन कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कमांडरला माहिती दिली होती. या कथित घटनेमध्ये कोणताही साक्षीदार नसल्याने कर्मचाऱ्यांना आरोपीच्या अपराधीपणाविषयी तर्क लावावा लागला, जे नैसर्गिक न्याय आणि योग्य प्रक्रियेच्या विरुद्ध आहे.

कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफला ताकीद : एअर इंडियाला सीएआरकडून पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे या घटनेचे योग्यप्रकारे वर्गीकरण गेले नाही आणि आवश्यकतेनुसार गुन्हा नोंदवला गेला नाही. या प्रकरणी कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफला ताकीद देणारी पत्रे देण्यात आली असून, विमानात घडलेल्या प्रसंगांचे 'अनुचित' असे वर्णन करताना सीएआरच्या व्याख्येनुसारच करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

केबिन कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफला मार्गदर्शन : ज्यायोगे नंतरच्या तपासात वस्तुस्थितीचे मूल्यमापन करता येईल. केबिन कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफला मार्गदर्शन करण्यात आले असून, ते कामावर परतलेले आहेत. संपूर्ण वस्तुस्थितीची कल्पना नसताना प्रत्यक्ष वेळेत ही घटना प्रभावीपणे हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सचोटीने केलेल्या प्रयत्नांची दखल एअर इंडियाने घेतली आहे.

कमांडरला मदत करणार : बिझनेस क्लासमधील सहप्रवासी यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात केबिन कर्मचाऱ्यांच्या कृतीची स्पष्ट प्रशंसा करण्यात आली असून, वैमानिकावरील टीका अपग्रेड मंजूर न झाल्याबाबतीतील आहे. निवळत चाललेली परिस्थिती आणि डि-रोस्टरिंगच्या कालावधीत कर्मचाऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेता कमांडरचा परवाना निलंबित करणे प्रमाणाबाहेर असल्याचे एअर इंडियाला वाटते आणि म्हणून त्यांना अपील करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण : २६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI102 विमानात एका ७० वर्षीय महिला प्रवाशीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली. त्या महिलेने या संदर्भात 'केबिन क्रू'कडे तक्रार केली. त्यानंतरदेखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत त्या महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. या प्रकरणी शंकर मिश्रा याच्यावर भादंवि 354, 294, 509, 510 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली. एअर इंडियाने शंकर मिश्राला प्रवाशासाठी चार महिन्याची बंदी घातली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.