ETV Bharat / state

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर सर्वत्र चर्चांना उधाण

author img

By

Published : May 3, 2023, 6:29 PM IST

देशातीलच नाहीतर राज्यातील भविष्यातील राजकारणातील हवेची दिशा कुणीकडे वळू शकते याबाबतची निर्णय क्षमता असलेला नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पहिले जाते. शरद पवार यांच्या कालच्या राजकारणातील निवृत्तीच्या घोषणा नंतर अनेक अफवांचा बाजार पिकला आहे .त्यामुळे राष्ट्र्वादीत नेमका सूर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

जितेंद्र अव्हाढ यांची प्रतिक्रिया

मुंबई : शरद पवार यांच्या कालच्या राजकारणातील निवृत्तीच्या घोषणा नंतर अनेक अफवांचा बाजार ऐकायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्र्वादीत नेमके सूर काय असा प्रश्न निर्माण झाला. देशातीलच नाहीतर राज्यातील भविष्यातील राजकारणातील हवेची दिशा कोणत्या दिशेला वळू शकते याबाबतचे निर्णय क्षमता असलेला नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पहिले जाते.

बैठक नाही तर भेटीसाठी आलो : पवारांच्या राजीनाम्यानंतर सकाळपासून यशवंतराव चव्हाण सभागृह ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते .पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी के. के. शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सर्व नेते उपस्थित होते. देशातील सर्वांनी शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत फेविचार करून सदर निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्याने सर्व ज्येष्ठ नेते वाय. बी. सेंटरला दाखल झाले होते. तब्बल दोन तासानंतर अशा कोणत्याही प्रकारच्या बैठकीचे आयोजन केले नसल्याचा निर्वाळा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन केला. आम्ही सर्व शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यामुळे बैठकीच्या अफवेला पूर्णविराम मिळाला.

गुरुवार सकाळी अफवांचा बाजार : राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत अध्यक्षपदाचा निर्णय होणार अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. सकाळी बैठकीला शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते दाखल झाले. मात्र, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील गैरहजर असल्याने अनेक चर्चा समोर आल्या. ते नाराज असल्याने बैठकीला आले नसल्याच्या अफवा सुरू झाल्या. यावरून देखील प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येऊन ते नाराज नसल्याचे सांगितले. त्यांच्या कारखान्याचा कार्यक्रम असल्यामुळे ते आज मुंबईत नव्हते. एका बाजूला शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक अफवांचा बाजारामुळे पक्षाचा कार्यकर्ता, कार्यकर्त्यांच्या मनात मात्र संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Ramdas Athawale On Sharad Pawar : शरद पवारांचा राजीनामा महाविकास आघाडीला मोठा धक्का : रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.