ETV Bharat / state

Mumbai High Court reprimanded : बास्केटबॉल असोसिएशनला उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर परिपत्रक मागे जिल्हास्तरीय ऑलम्पिकचा मार्ग मोकळा

author img

By

Published : Jan 4, 2023, 11:05 PM IST

उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर (Mumbai High Court reprimanded) मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत (Mini Olympic Tournament) जिल्हास्तरीय बास्केट बॉल असोसिएशनच्या (Basketball Association) खेळाडूंना खेळण्यास मज्जाव करणारे परिपत्रक मागे घेतले. तशी माहिती महा बास्केटबॉल असोसिएशनकडून बुधवारी न्यायालयात देण्यात आली. या निर्णयामुळे याचिकाकर्त्यांसह राज्यातील अन्य बास्केट बॉल खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बास्केटबॉलपटूना खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest news from Mumbai)

Mumbai High Court reprimanded
उच्च न्यायालय

मुंबई : तुम्ही असा फतवा कसा काढू शकता? बास्केट बॉल प्रीमियर लीगमध्ये कोण खेळत माहिती आहे का? (Mumbai High Court reprimanded) अनेकजण हे चौकीदार, वाहनचालक, वाहक म्हणून काम करतात. खेळातून करियर घडवण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यावर तुम्ही अशा प्रकारे न खेळण्याची अट कशी लादू शकता? (Mini Olympic Tournament) अशा प्रश्नाची सरबत्ती खंडपीठाने केली आणि प्रसिद्ध केलेले परिपत्रक हे पुर्वग्रहदूषित आहे. (Basketball Association) त्यामुळे परिपत्रक त्वरित मागे घ्या अन्यथा आमच्याशी गाठ आहे अशा शब्दांत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस. जी. डीगे यांच्या खंडपीठाने महा बास्केटबॉल संघटनेला फटकारले. त्यावर परिपत्रक मागे घेत असल्याचे महा बास्केटबॉलकडून सांगण्यात आले. त्याची दखल घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली. (Latest news from Mumbai)

या खेळाडूंना केला मज्जाव : राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महा बास्केट बॉल संघटनेला बास्केट बॉल फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाली. त्यानंतर जिल्हास्तरीय बास्केट बॉल संघटनांना पत्र पाठवून महा बास्केट बॉल संघटनेशी संलग्न होण्याची मागणी केली. त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महा बास्केट बॉल संघटनेची मान्यता नसल्यामुळे जिल्हा स्तरीय बास्केट बॉल संघटनेतील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच इत्यादींना मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास मज्जाव केला. तसेच सहभाग घेतल्यास पुढे कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही अशा आशयाचे परिपत्रक 25 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केले. त्या परिपत्रकाला संकेत काळभोर आणि अन्य खेळाडूंनी ॲड. साकेत मोने आणि ॲड. देवांश शहा यांच्यामार्फत आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

तुम्हाला संघटनेशी संलग्न का व्हायचे आहे ? अशी विचारणा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केली. महा बास्केट बॉल संघटनेशी आम्ही संलग्न नसल्यामुळे आम्हाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. असे केल्यास राज्यभरातील 8 पुरुष आणि 8 महिला संघातील एकूण 192 खेळाडूंना खेळण्यापासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे हे परिपत्रक खेळाडूंवर अन्यायकारक ठरणारे आहे अशी माहिती मोने यांनी न्यायालयाला दिली. महाराष्ट्र राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने 1 ते 12 जानेवारी दरम्यान मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यासाठी पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावतीसह नऊ जिल्ह्यात स्पर्धा होणार असून स्पर्धेमध्ये 40 विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण 10 हजार 456 खेळाडू व मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.