ETV Bharat / state

Dharavi Redevelopment Project : कसा असेल धारावी पुनर्विकास प्रकल्प?

author img

By

Published : Nov 30, 2022, 6:22 PM IST

Updated : Dec 2, 2022, 6:13 PM IST

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (Dharavi Redevelopment Project) राज्य सरकारकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. त्यात एकूण तीन कंपन्यांनी आपल्या निविदा पाठवल्या होत्या. यात अदानी समूहाने 5000 69 कोटींची बोली या प्रकल्पासाठी लावली. (Adani Group bid for Dharavi).

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : मुंबईतील धारावीची आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळखली जाते. गौतम अदानी यांच्या कंपनीने आता या धारावीचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. (Adani Group bid for Dharavi). अदानी प्रॉपर्टीज ही जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्तीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी धारावीचा पुनर्विकास करणार आहे. अदानी समूहाच्या या कंपनीने धारावी झोपडपट्टीच्या पुनरुज्जीवनासाठी पुनर्विकास प्रकल्पाची बोली जिंकली आहे. औद्योगिक राजधानी मुंबईच्या मध्यभागी 600 एकर जागेवर पसरलेली ही झोपडपट्टी आता बदलणार आहे. (Dharavi Redevelopment Project)

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

कशी लागली बोली? : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या. त्यात एकूण तीन कंपन्यांनी आपल्या निविदा पाठवल्या होत्या. यात अदानी समूहाने 5000 69 कोटींची बोली या प्रकल्पासाठी लावली. अदानी समूहाने लावलेली बोली सर्वाधिक असल्याने अखेर त्यांची निविदा मान्य करण्यात आली. अखेर आता अदानी समूह या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार आहे. या पुनर्विकासासाठी धारावी वासियांना तब्बल 18 वर्ष वाट पहावी लागली आहे.

रेल्वेच्या जागेचा प्रश्न : या अठरा वर्षाच्या काळात सरकारकडून धारावीत राहणाऱ्या लोकांसाठी विविध योजना आणल्या गेल्या. मात्र, त्या कागदावरच राहिल्या. त्या धारावी वासीयांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यातच धारावीत रेल्वे मंत्रालयाची देखील 45 एकर जमीन असल्याने त्याचा देखील तिढा निर्माण झाला होता. अखेर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यालयाशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला.

फक्त 58 हजार झोपडपट्टी धारक पात्र : गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने बोललीचा आकडा 3,150 कोटींवरून 1,600 कोटींवर आणला. जेव्हा ही बोली लावण्यात आली त्यावेळी एकूण आठ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, फक्त तीनच कंपन्यांनी यात आपल्या निविदा सादर केल्या होत्या. यशस्वी बोलीदार धारावी अधिसूचित क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण DRA आणि SRA सोबत विशेष उद्देश वाहन तयार करेल. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुमारे 58 हजार झोपडपट्टीधारक मोफत घरांसाठी पात्र आहेत. तर, साधारण 50 हजार अपात्र नागरिक धारावीतल्या झोपडपट्टीत भाडेकरू म्हणून वास्तव्याला आहेत.

240 हेक्टर क्षेत्र पुनर्विकासाखाली : 240 हेक्टर क्षेत्राचा विकास या धारावी पुनर्विकास प्रकल्पात केला जाणार आहे. या 240 हेक्टर क्षेत्रात व्यावसायिक, छोटे उद्योग आणि निवास असे तीन भाग करण्यात आले आहेत. या 240 हेक्टर क्षेत्राच्या विकासाचा अंदाजे खर्च सुमारे 23 हजार कोटी आहे. ज्याचा फ्लोअर स्पेस इंडेक्स 4 पेक्षा जास्त आहे.

Last Updated : Dec 2, 2022, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.