ETV Bharat / state

Shilpa Shetty Kiss Case : रिचर्ड गेरे चुंबन प्रकरण रद्द करण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : Jan 8, 2023, 5:37 PM IST

Shilpa Shetty kiss case
Shilpa Shetty kiss case

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ( Bollywood actress Shilpa Shetty ) अश्लीलतेचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव ( Shilpa Shetty run to the High Court ) घेतली आहे. 2007 मध्ये राजस्थान हॉलिवूडमधील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिनेता रिचर्ड गेरे ( Actor Richard Gere ) यांनी शिल्पा शेट्टीचे सार्वजनीक ठीकाणी चुंबन घेतले ( Actor Richard Gere Shilpa Shetty Kiss Case ) होते. त्यांनतर शिल्पा शेट्टीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई - अभिनेता रिचर्ड गेरे यांनी 2007 मध्ये राजस्थान हॉलिवूडमधील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टीचे ( Bollywood actress Shilpa Shetty ) सार्वजनिकपणे चुंबन घेतले ( Richard Gere Shilpa Shetty Kiss Case ) होते. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरुद्ध अश्लीलतेच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. शिल्पा शेट्टीने गुन्हा रद्द ( Actor Richard Gere Shilpa Shetty Kiss Case ) करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल ( Shilpa Shetty run to the High Court ) केली आहे. यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

Shilpa Shetty kiss case
रिचर्ड गेरे चुंबन प्रकरण

खटला रद्द करण्याच्या मागणी- शिल्पा शेट्टीने तिच्याविरुद्ध 2007 मधील चुंबन प्रकरणात सुरू असलेला खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, तक्रारदाराला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. सहआरोपी हॉलीवुड अभिनेता रिचर्ड गेरे याने तिचे जाहीर चुंबन घेतलेल्या घटनेत शिल्पा शेट्टीवर अश्लीलता पसरण्याचा आरोप करण्यात आला होता.

शिल्पा शेट्टीचे घेतले चुंबन - 15 एप्रिल 2007 रोजी बाह्य दिल्लीतील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे एड्स जनजागृती मोहिमेदरम्यान, शिल्पा शेट्टीने रिचड गेरेला स्टेजवर नेले होते. रिचड गेरेला स्टेजवर गेल्यानंतर त्यांने शिल्पा शेट्टीला मिठी मारत तीचे चुंबन घेतले होते. त्यानंतर जयपूर, अलवर, गाझियाबाद येथे काही नागरिकांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती .

उच्च न्यायालयात धाव - या प्रकरणी 2011 मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सर्व प्रकरणे एकत्र करून मुंबईला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दोन तक्रारी मुंबईच्या बॅलार्ड पिअर मॅजिस्ट्रेट न्यायालयात वर्ग करण्यात आल्या होते. सविस्तर सुनावणीनंतर शिल्पाला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दोषमुक्त केले होते. तर दुसर्‍या प्रकरणात हे समन्स ट्रायबल केस म्हणुन नोंदवण्यात आले होते. दुसऱ्या प्रकरणात दंडाधिकार्‍यांनी शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्या आदेशाला आव्हान देत तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोणताही अश्लील कृत्य केलेले नाही - न्यायमूर्ती आरजी अवचट यांच्या खंडपीठासमोर वकील मधुकर दळवी यांनी युक्तिवाद की 2007 च्या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यास शिल्पा शेट्टीने कोणताही अश्लील कृत्य केलेले नाही. आयोजित कार्यक्रमाचा उद्देश धर्मादाय, एड्सची जनजागृती करणे होता. रिचर्ड गेरे यांनीही या कार्यात उदारपणे योगदान दिले आहे. केवळ नामांकित व्यक्तींचा सहभाग असल्याने अवास्तव प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही असंतुष्ट लोकांनी या घटनेला वेगळाच रंग दिल्याचा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयात केला.

प्रतिवादींना नोटीस - न्यायमूर्ती अवचट यांनी प्रतिवादींना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारशिवाय जयपूर येथील या प्रकरणातील तक्रारदार वकील पूनमचंद भंडारी यांनाही चार आठवड्यांत उत्तर दाखल करावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण - एप्रिल 2007 ची आहे जेव्हा रिचर्ड एड्स जनजागृती कार्यक्रमासाठी जयपूरला आले होते. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, रिचर्ड गेरे पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमादरम्यान शिल्पा रिचर्डचा हात धरत स्टेजवर पोहोचली. तेव्हा रिचर्डने आधी शिल्पा शेट्टीच्या हातावर चुंबन घेतले. नंतर जबरदस्तीने शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले होते. अचानक हे कृत्य पाहून शिल्पा शेट्टीही हैराण झाली होती. रिचर्डच्या अशा वागणुकीनंतर त्याला प्रचंड विरोध झाला होता. त्यांनतर त्यांने जाहीर माफी मागावी लागली होती. या प्रकरणानंतर रिचर्ड गेरे, शिल्पा शेट्टी यांच्यावर अश्‍लीलतेचा आरोप करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.