Sherlyn Chopra vs Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा
Updated on: Jan 24, 2023, 7:46 PM IST

Sherlyn Chopra vs Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा
Updated on: Jan 24, 2023, 7:46 PM IST
अभिनेत्री राखी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. आज सोमवार (दि. 24 जानेवारी)रोजी सुनावणी दरम्यान (दि. 1फेब्रुवारी)पर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांनी दिले आहेत. हे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मुंबई : राखी सावंत आणि आज सुनावणी झाली. त्यावेळी कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांनी मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राखी सावंतवर शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.
राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांची परस्परांविरोधात तक्रार : अभिनेत्री राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केलेला आहे. चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत, अधिवक्ता फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
राखीच्या अटकेची मागणी करण्यात आली होती : शर्लिन चोप्राने ट्विट करत राखीच्या अटकेची मागणी केली होती. त्याअगोदर राखीने आईच्या आजारपणाची व्यथा मांडली होती. राखी सावंतची आई कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. अशा काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राखीच्या आईच्या उपचारात मदत केली आहे. यापूर्वी सलमान खानने मोठी मदत केली होती. दरम्यान, शर्लिन चोप्राचे वकील सुहेल शरीफ यांनी सांगितले की राखीने तिच्या आईचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले आहे, ज्यामध्ये तिची प्रकृती गंभीर असल्याचे दिसून येते. या आधारावर आणि मानवतावादी आधारावर, शर्लिन आणि तिचे वकील सध्या तिच्या अटकेसाठी दबाव आणत नाहीत असे म्हणाले आहेत.
प्रकरण काय? : राखी सावंतने एका पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्राचे काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले होते. तसेच तिचे नावही घेतले होते. या प्रकरणी शर्लिन चोप्राने तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (8 नोव्हेंबर 2022 )रोजी राखीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला होता. राखीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ जारी केल्याचा आरोपही तिने केला होता. शर्लिनने राखीला 'गटर माऊथ' आणि 'पोटी माऊथ' असेही संबोधले होते.
कोण आहे राखी सावंत : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखी नुकतीच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसली होती. बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून राखीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिला बिग बॉसची बायको असे म्हटले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या ती शर्लिन चोप्रा हिने केलेल्या आरोपांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चे आहे.
हेही वाचा : न्यायालयाने डीजे शो डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
