ETV Bharat / state

Rakhi Sawant Allegation on Adil Khan : 'आदिलने अत्याचार करत दागिने हिसकावले'

author img

By

Published : Feb 7, 2023, 8:35 PM IST

Updated : Feb 7, 2023, 9:47 PM IST

अभिनेत्री राखी सावंतने पती आदिल दुर्राणी याने मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. यानंतर आदिलला मंगळवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आदिलने नकळत तिच्या फ्लॅटमधून पैसे आणि दागिने काढून घेतले, असा आरोप राखी सावंतने केला आहे. राखी सावंतने केलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Rakhi Sawant on Adil Khan Durrani
राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत संवाद साधताना

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री राखी सावंतच्या मेहंदीने तिच्या लग्नाचा रंग उडालेला नाही, तोवरच राखीने तिचा पती आदिल खान दुर्रानी विरुद्ध अंधेरीतील ओशवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राखी सावंतने आदिलवर मारहाण तसेच दागिने हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. ओशिवरा पोलिसांनी आज आदिलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आज दुपारी राखी सावंत देखील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली.

राखी सावंतचा आदिलवर आरोप : राखी सावंतने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले की, राखी सावंत आणि आदिल दुर्राणई जानेवारी 2022 मध्ये संपर्कात आले आणि दोघांनी संयुक्त व्यवसाय खाते उघडले. राखी सावंतच्या हिच्या नकळत दुर्राणीने जूनमध्ये कार खरेदी करण्यासाठी त्या खात्यातून 1.5 कोटींहून अधिक रक्कम काढली. परंतु त्याने तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितल्याने त्यावेळी तिने आक्षेप घेतला नाही, असे सावंत यांनी पोलिसांना तक्रारीत सांगितले.

दागिने चोरल्याचा आरोप : राखी सावंतने तक्रारीत आरोप केला आहे की, दुर्राणीने तिला एकापेक्षा जास्त वेळा धमकी दिली की मी तिच्यावर अॅसिड फेकणार आहे. समोरासमोर किंवा रस्ता अपघातात तिला ठार करणार आहे. दुर्राणी यांनी तिला नमाज अदा करण्यास भाग पाडल्याचा आरोपही सावंतने केला आहे. रविवारी (5 फेब्रुवारी) रात्री सावंतला त्यांच्या कपाटातून ५ लाख रुपये रोख आणि आईचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला तिच्या अंधेरी इमारतीच्या वॉचमनकडून कळले की, दुर्रानी तिच्या अनुपस्थितीत फ्लॅटला भेट दिली होती.

आरोपांवरून एफआयआर दाखल : राखी सावंतने सोमवारी रात्री ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधला. आदिल दुर्रानी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 406 (विश्वासभंग) आणि 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. राखी सावंतने केलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.




अत्याचार करत असल्याचा आरोप : पोलिसात एफआयआर नोंदवण्यापूर्वी राखीने आदिल खानबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आदिल खानने माझ्या घराच्या चाव्या माझ्याकडून हिसकावून घेतल्या आहेत. त्या परत करण्यास तो नकार देत आहे. तो खूप दिवसांपासून माझ्यावर अत्याचार करत आहे. बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांने माझा वापर केला आहे. माझ्याकडे असलेले सर्व पैसे त्याने काढून घेतले आहेत. आदिलवर अनेक गुन्हेही सुरू आहेत.

हेही वाचा : Rakhi Sawant Accepts Islam: 'आता परिणाम भोगायला तयार राहा'.. राखी सावंतला हरिद्वारच्या परशुराम आखाड्याकडून धमकी

Last Updated :Feb 7, 2023, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.