ETV Bharat / state

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माला हायकोर्टाने फटकारले; लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश

author img

By

Published : Mar 30, 2023, 4:42 PM IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र विक्रीकर विभागाच्या नोटिशीला आव्हान देणारी याचिका अनुष्का शर्माने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश शर्मा यांना दिले आहेत. तिकडे न्याय न मिळाल्यास आमच्याकडे या असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Anushka Sharma
Anushka Sharma

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माला हायकोर्टाने फटकारले आहे. महाराष्ट्र विक्रीकर विभागाच्या नोटिसीला आव्हान देणारी अनिष्का शर्माची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. आगोदर लवादाकडे दाद मागा तिकडे न्याय न मिळाल्यास मग न्यायालयात या अशी फटकार उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माला लगावली आहे.

28 लाख भरावे लागणार : अभिनेत्री अनुष्काला उच्च न्यायालयाने अपीलीय लवादाकडे दाद मागावी, असे म्हणत शर्मा यांची याचिका न्यायालयाने फेटाळुन लावली आहे. अनुष्का शर्माच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आज सांगितले की, प्रक्रिया नियमांनुसार व्हायला हवी. महाराष्ट्र विक्रीकर विभागाच्या नोटिसांना आव्हान देऊनही उपयोग झाला नाही. दुसरीकडे, अनुष्काला 2 कोटी 80 थकबाकी भरावी लागली, अशी नोटीस विक्रीकर विभागाने जारी केली आहे. आता अपील करण्यासाठी अनुष्काला लवादाकडे 28 लाख रुपये भरावे लागणार आहेत. अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहून त्यामध्ये कला सादर करत होती. त्यामुळे कलेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर तिला विक्रीकर भरावा लागतो. महाराष्ट्र राज्य विक्रीकर विभागाचा दावा उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला.

चार स्वतंत्र याचिका : राज्य विक्रीकर विभागाने अनुष्का शर्माला बजावलेल्या नोटिसीला आव्हान देणारी याचिका तिने उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिने चार वर्षांसाठी आयकर संदर्भात चार स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माची याचिका दाखल करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने पुन्हा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. त्याचाही काही उपयोग झाला नाही. अनुष्काने असा दावा केला की, तिने पुरस्कार सोहळ्यात कला सादर केली होती. मालकी हक्क कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना सादर केलेल्या कलेमुळे तिला मिळणारे उत्पन्नाचा मालकी हक्क तिच्याकडे होता. त्यामुळे, जरी तिने मालकी हक्क आयोजकांना दिले असले तरी, विक्री केलेल्या कलेचा हक्क निहित आहे.

तर... न्यायालयात या : संदर्भात राज्याच्या विक्रीकर विभागाने अनुष्का शर्माला 2012 ते 2016 अशी सलग चार वर्षे नोटीस बजावली होती. ही नोटीस राज्याच्या विक्रीकर विभागाच्या आयुक्तांनी बजावली आहे. या सर्व नोटिसा तिने दोन स्वतंत्र खटल्यांना आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही, उलट अनुष्काला 2 कोटी 80 लाख भरावे लागले, अशी नोटीस विक्रीकर विभागाने जारी केली आहे. आता अपील करण्यासाठी अनुष्काला लवादाकडे 28 लाख रुपये भरावे लागणार आहेत. या लवादात न्याय न मिळाल्यास न्यायालयात यावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - CM Will Visit Ayodhya: तारीख ठरली! मुख्यमंत्री शिंदे शिवसेना आमदारांसह लवकरच अयोध्या दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.