ETV Bharat / state

Board Exam Copy : कॉपी बहाद्दरांसाठी मोठी बातमी; प्रशासन करणार करेक्ट 'कार्यक्रम'

author img

By

Published : Jan 12, 2023, 5:41 PM IST

राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून होणारे कॉपी प्रकरणे रोखणे हे बोर्डासमोर आव्हान असते. राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी बोर्डाकडून कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.

Prevent copying in board exam
बोर्डाच्या परीक्षेत कॉपीला आळा घाला

मुंबई / पुणे : १० वी, १२ वी परीक्षेतील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी एक कृती कार्यक्रम स्पर्धा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळे विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. त्यात एकसुत्रीपणा आणण्यासाठी एक कृती कार्यक्रम तयार करण्याचे राज्य शिक्षण मंडळाने ठरविले आहे अशी माहिती सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

कृती कार्यक्रम तयार करणार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत नऊ विभागीय मंडळमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.१० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.१२ वी या दोन सार्वत्रिक परीक्षाचे आयोजन करण्यात येते. परीक्षेच्या कालावधीत विविध मार्गांनी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपकम राबवित असतात. तथापि या प्रयत्नात एकसूत्रीपणाची गरज सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व समावेशक असा कृती कार्यक्रम तयार करण्याचे मंडळाने ठरविले आहे.


येथे पाठवा कृती कार्यक्रम : परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजमाध्यम इत्यादींच्याकडून परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण कृतिकार्यक्रम मागविण्यात येत आहेत. आपला कृतिकार्यक्रम विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने नमूद नोंदवावयाचा आहे. या लिंकवरील प्राप्त कृतिकार्यक्रमाचे मूल्यमापन करून यापैकी दहा उत्कृष्ट, निवडक कृतिकार्यक्रमाची तज्ञ समिती मार्फत निवड करून सदर कृतिकार्यक्रम पाठविणा-यांचा मंडळामार्फत यथोचित गौरव करण्यात येईल, तज्ञ समितीचा निर्णय अंतिम असेल. याकरिता मंडळाने गुगल फॉर्म तयार केला आहे.

सदरच्या गुगल फॉर्मची लिंक गुगल लिंक : https://forms.gle/vTxy21P93W8d4foAA असून ती मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवार दि.११.०१.२०२३ ते शुक्रवार दि.२०.०१.२०२३ पर्यंत कृतिकार्यक्रम पाठवण्याचे आवाहन शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे. कमी खर्चिक कमी मनुष्यबळाची आवश्यकता असलेला कृतिकार्यक्रम, सर्वत्र राबविण्यास उपयुक्त असा कृतिकार्यक्रम, सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणेचाच वापर करून अमलबजावणी करता येण्यासारखा कृतिकार्यक्रम, कमी वेळेत अंमलबजावणी करता येणारा कृतिकार्यक्रम खाली केलेल्या लिंकवर

हेही वाचा : SSC HSC Board Exam : बारावी दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरू

कृती कार्यक्रम गरजेचा : मागील वर्षी मोबाईल फोनचा वापर करुन कॉपी केल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. इतर अनेक पर्याय कॉपी करताना वापरले जातात. सर्वच विभागामध्ये ही कॉपी प्रकरण समोर येतात. यासाठी खास भरारी पथक सुद्धा कार्यरत असते. मात्र, यासोबत आणखी कृती कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचा विचार राज्य मंडळाचा आहे. त्याच अनुषंगाने कृती कार्यक्रम लोकसहभागातून मागवण्यात येत आहे.


गुगल लिंक https://forms.gle/vTxy21P93W8d4foAA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.