ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात ९२६ नवे कोरोना रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी ३ मृत्यूची नोंद

author img

By

Published : Apr 7, 2023, 10:28 PM IST

Maharashtra Corona Update
कोरोना अपडेट

राज्यात काल ८०३ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन ९२६ रुग्णांची नोंद करण्यात आली. काल कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजही तितक्याच मृत्यूची आकडेवारी नोंदविली गेली. राज्यात ३० मार्चला ६९४, १ एप्रिलला ६६९, ४ एप्रिलला ७११ रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत आज २७६ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई: आज ९२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ८१ लाख ४८ हजार ५९९ वर पोहचला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी ३ मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यूचा आकडा १ लाख ४८ हजार ४५७ वर पोहोचला आहे. आज ४२३ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ लाख ९५ हजार ६५५ वर पोहचला आहे. राज्यात ४४८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत १३६७, पुण्यात ७८८, ठाण्यात ७८९, रायगड मध्ये २५४ तर नागपूर येथे २७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. परभणी हा राज्यात एकमेव असा जिल्हा आहे ज्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही.


मुंबईत २७६ रुग्ण: मुंबईत काल २१६ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ११ लाख ५८ हजार ४६० वर पोहचला आहे. आज एकही मृत्यू नोंद झालेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा १९ हजार ७४९ वर स्थिरावला आहे. १७७ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ११ लाख ३७ हजार ३४४ वर पोहचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात १०४ रुग्ण दाखल असून ११ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.


भीती बाळगू नका: गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे मुंबईमधील नागरिकांनी भीती न बाळगता गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाण्याचे टाळा या कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

स्मार्टफोन 90 मिनिटाला स्वच्छ करा: सध्या जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांकडून विविध उपाया बाबत चर्चा केली जात आहे. फरिदाबाद येथील फोर्टिस इस्कॉर्ट रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रवी शंकर झा यांनी आपला स्मार्टफोन दर 90 मिनिटाला सॅनिटायझरने स्वच्छ करून वापण्याचा सल्ला दिला आहे.

स्क्रिनवर तीनपट जास्त जंतू: मोबाईल फोन वापरताना त्याचा संपर्क आपले डोळे, नाक, तोंड यांच्याशी येऊ नये म्हणून मोबाईल कव्हर किंवा ब्लू टूथ वापरावा, असेही ते म्हणाले आहेत. एका संशोधनानुसार मोबाईल च्या स्क्रीनवर टॉयलेट सीटवर असणाऱ्या जंतुंच्या तीन पट जास्त जंतू असतात. 20 स्मार्टफोन युजर्स पैकी एकजण सहा महिन्यातून एकदा आपला स्मार्टफोन स्वच्छ करत असतो, असेही या संशोधनात समोर आले आहे.

कोरोनाबाधित व्यक्तीचा मोबाईल टाळा: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसातून एकदा तरी सॅनिटायझरने मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करण्याचा सल्ला ज्योती मुत्ता यांनी दिला आहे. त्या दिल्ली येथील श्री बालाजी मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र मधील सीनिअर कन्सल्टंट आहेत. तुम्ही ही प्रक्रिया दिवसातून एकदा करू शकता. तसचं दिवसभर मोबाईलवर काम केल्यानंतर संध्याकाळी देखील मोबाईल स्वच्छ करून ठेऊ शकता, असेही त्या म्हणाल्या. कोणाला श्वसनाशी संबधित काही समस्या असतील किंवा इतर कोणता आजार असेल, अशा व्यक्तींचा मोबाईल शक्यतोवर टाकावा. त्यामुळे आजार पसरणार नाही.

हेही वाचा: Husband Plucked Wife Ear : भांडण विकोपाला; नवऱ्याने थेट बायकोचा उपटला कान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.