ETV Bharat / state

Mumbai local Train Accident: बेलापूर खारकोपर दरम्यान रेल्वेचे तीन डबे घसरले, रेल्वे सेवा ठप्प

author img

By

Published : Feb 28, 2023, 11:25 AM IST

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर बेलापूर ते खारकोपर या रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनचे तीन डब्बे रुळावरून घसरले आहेत. रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेले नाही. या अपघातामुळे बेलापूर खारकोपर नेरूळ या मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे.

3 local Coaches Derailed at Kharkopar
रेल्वेचे तीन डबे घसरले

मुंबई: मुंबईमध्ये मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर तसेच पश्चिम रेल्वे या चार मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध आहे. यापैकी ठाणे ते नवी मुंबई या दरम्यान चालवल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ८.४६ दरम्यान बेलापूर येथून ठाण्याकडे येणाऱ्या रेल्वेचे तीन डब्बे रुळावरून घसरले आहेत. रेल्वे प्रवासी कामावर जाण्याच्या वेळेत ही ट्रेन रुळावरून घसरली.

हा अपघात झाल्याची माहिती मिळताच प्रवशांनी ट्रेन मधून उड्या मारून, चालत बाजूचे रेल्वे स्थानक गाठले. या अपघातात कोणीही प्रवासी जखमी झाले नसल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेची बचाव टिम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे बेलापूर खारकोपर नेरूळ या मार्गावरील सेवा बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सविस्तर थोड्याचवेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.