ETV Bharat / state

Mumbai Crime: बनावट कागदपत्रे वापरून सिमकार्ड सक्रिय केल्याप्रकरणी 13 जणांना अटक, आरोपींकडून एकूण 684 सिमकार्ड जप्त

author img

By

Published : May 13, 2023, 8:43 PM IST

मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये सिमकार्ड विक्रेते बनावट कागदपत्रे वापरून ग्राहकांनी सादर केलेल्या तपशीलांच्या आधारे बनावट कागदपत्रे वापरून सिमकार्ड सक्रिय करत होते. आरोपींकडून 2 हजार 197 सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

Mumbai Crime
मुंबईत 13 जणांना अटक

माहिती देताना सहपोलीस आयुक्त

मुंबई : मुंबई शहरात बनावट कागदपत्राच्या आधारे सिमकार्ड एक्टीव्ह करणाऱ्यांविरुध्द DoT, भारत सरकार यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे, कारवाई करण्यात आलेली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे, Telecom Services Providers (TSPs) यांच्याकडून माहिती प्राप्त करून मोबाईल धारकाचे फोटो व त्यांची माहिती यांचे विश्लेषण केले. काही व्यक्ती हे स्वतः चे वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटोचा वापर करून बनावट आधारकार्ड तयार करून, ते खरे असल्याचे भासवले. त्याचा वापर काही टेलिफोन कंपन्यांनी त्यांना विश्वासाने सोपविलेली सिमकार्ड अ‍ॅक्टीव्ह करून ते स्वतःच्या फायदयासाठी वितरित केल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.



१३ आरोपींना अटक: त्याबाबत मुंबई शहरातील वि. प. मार्ग पोलीस ठाणे, डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मलबार हिल पोलीस ठाणे, सहार पोलीस ठाणे, डी बी मार्ग पोलीस ठाणे व बांगुर नगर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद केले. वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार केले. विविध ठिकाणी कारवाई करून एकुण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 13 आरोपींविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४६५, ४६७, २४६८, ४७१, ३४ अन्वये वेगवेगळे ०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कॉल सेन्टर मालकास अटक: पोलीस तपासादरम्यान विविध संगणकीय साधने ४ लॅपटॉप, ६० मोबाईल्स ०२ डेमो कार्डस् असे जप्त करण्यात आले असून या कारवाई दरम्यान विविध सिमकार्डस् विक्रेते आणि पी.ओ. एस. एजन्टस् यांना अटक करण्यात आली आहे. तसेच तेथे डम्मी सिमकार्डचा वापर करून चालविणाऱ्या कॉल सेन्टर मालकास देखील अटक करण्यात आली आहे.



इतके सिम कार्ड केले जप्त: वेगवेगळ्या वेशभूषेत व बनावट कागदपत्रे बनवुन अ‍ॅक्टीवेट करण्यात आलेली सिम कार्डस जप्त करण्यात आली. व्ही पी मार्ग पोलीस ठाण्याने एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून 376 सिम कार्ड जप्त केले आहे. तर डी बी मार्ग पोलीस ठाण्याने दोन आरोपींना अटक करून त्याच्याकडून 339 सिम कार्डस जप्त केली. त्याचप्रमाणे मलबार हिल पोलिसांनी एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून 684 सिम कार्ड जप्त केली आहेत. तसेच सहार पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 469 सिम कार्ड्स हस्तगत केली आहे.

2 हजार 197 सिम कार्ड जप्त: त्याचप्रमाणे बांगुर नगर पोलीसांनी पाच आरोपींकडून 327 सिम कार्ड्स जप्त केली आहेत. अशा प्रकारे संबंध मुंबईत 13 आरोपी अटक करत त्यांच्याकडून 2 हजार 197 सिम कार्ड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक 13 आरोपीतांकडे अधिक तपास करून सिम कार्डची विक्री करणाऱ्या इतर व्यक्तीचा शोध घेवून आणि बनावट सिमकार्डचा वापर करणाऱ्या कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime बोरिवलीत फिरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला एमएचबी पोलिसांची कामगिरी
  2. Mumbai Crime News बोरिवली पोलिसांनी सीसीटीव्हीवरून केली दोन आरोपींना अटक 90 हजार रुपये आणि साडेचार लाखांचे दागिने केले होते लंपास
  3. Mumbai Crime News अदानी इलेक्ट्रिसिटीची लाखोंची फसवणूक चोरट्यांनी बनावट स्लिप दाखवून लंपास केली १७ लाखाची हाय व्होल्टेज वायर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.