ETV Bharat / state

11th Online admission: 11 वी पहिली गुणवत्ता यादी झाली जाहीर; कट ऑफ टक्केवारीमध्ये घसरण

author img

By

Published : Jun 14, 2023, 12:15 PM IST

11th Online admission
11 वी पहिली गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये 12 जून ऑनलाइन प्रवेशानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. मंगळवारपर्यंत 3 लाख 91 हजार नोंदणी आणि तर तीन लाख 29 हजार विद्यार्थी पडताळणी झाली आहे. मात्र गुणवत्ता यादीमध्ये एक ते दोन टक्के कट ऑफ टक्केवारीमध्ये घसरण झाली आहे. कला आणि विज्ञान या शाखेमध्ये गुणवत्तेमध्ये घसरणमध्ये झालेली आहे.

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला आपला संस्थात्मक कोटा, अल्पसंख्यांक कोटा, विविध प्रकारचा कोटा जाहीर करावा लागतो. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्यांनी अल्पसंख्याक कोटा घोषित केलेले आहे. त्यात ख्रिश्चन अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये कला शाखेत या वर्षी 81.6 टक्के इतका कट ऑफ तर मागील वर्षी 83.6 टक्के इतका कट ऑफ होता. विज्ञान शाखेत अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेचा कट ऑफ मागील वर्षी 78.8 टक्के तर यंदा तो 78 टक्के आहे. म्हणजे फारसा फरक झालेला नाही. कला शाखेच्या तुलनेत विज्ञानाच्या कट ऑफची टक्केवारी देखील कमी दिसते.


यावर्षीचा कट ऑफ : यासंदर्भात मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक कोट्यामध्ये मागच्या वर्षी 78.7 टक्के इतके कट ऑफ होता. यंदा त्यात घसरण होऊन 76.6 टक्के इतका झाला आले. मात्र गेल्यावर्षी कॉमर्स संदर्भातील कट ऑफ 70 टक्के इतका होता, यंदा त्यात वाढ होवून 78 टक्क्यांपर्यंत कट ऑफ पोहोचला आहे. या संदर्भात शिक्षक भारतीचे नेते ईटीव्हीसोबत संवाद करताना म्हणाले की, यंदा दहावीचा निकाल लागला. त्यामुळे प्रवेश जरा उशिरा सुरू झालेले आहे. कट ऑफ कमी होतो, वाढतो हे दर वर्षी थोड्याफार फरकाने होत असते. आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. सर्व गुणवत्ता यादी जाहीर झाली की, संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.


पसंतिक्रम निवडण्याचे काम : 11 वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश कोर्टांतर्गत जागांसाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 14 जूनपासून नाव नोंदणी, विद्यार्थ्यांचा अर्ज प्रमाणित करणे, सर्व साधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे, तसेच विद्यार्थ्यांना या गुणवत्ता यादीबाबत सूचना करायच्या असतील, तर त्या करायला देखील त्यांना या मुदती मुभा आहे. 17 जून ते 24 जून या कालावधीमध्ये या संदर्भातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतिक्रम निवडण्याचे काम करायचे आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय अलर्टमेंट केले जातील, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन त्याची खात्री करायची आणि मग त्यांचे प्रवेश निश्चित होतील. संकेतस्थळावर या संदर्भात तपशिलासाठी भेट द्यावी.



हेही वाचा :

  1. 11th online admission 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम, विद्यार्थ्यांना बसणार आर्थिक भुर्दंड
  2. 11th Online Admission Process 2023: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी वेळापत्रक जाहीर; विद्यार्थी 'या' कालावधीत करू शकतात अर्ज
  3. 11th Online Admission 2023: अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 25 मेपासून होणार ऑनलाईन नोंदणी सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.