ETV Bharat / state

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म, पालकांसमोर पालनपोषणाचा बिकट प्रश्न

author img

By

Published : Nov 18, 2019, 5:38 PM IST

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील गायत्री सोपान बोयणे येथिल महिलेने शहरातील एक खासगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. आठव्या महिण्यातच या मातेची गुंतागुतीची वैद्यकीय प्रसुती करण्यात आली.

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्याला जन्म

लातूर - जिल्ह्यातील निलंगा येथील गायत्री सोपान बोयणे येथील महिलेने शहरातील एका खासगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. तिळ्यासह मातेची तब्येत ठीक आहे. आठव्या मिहिन्यातच या मातेची गुंतागुंतीची वैद्यकीय प्रसुती करावी लागली. या महिलेने यापूर्वी जुळ्यांना जन्म दिला होता. यावेळी तिला दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्ये झाली आहेत. तिन्ही बाळाचे वजन वैद्यकीय मापकानुसार कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्याला जन्म

डॉ. एम.एन कुंडुंबले यांनी या महिलेची प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी प्रयत्न केले. १७ नोहेबरला दुपारी १२.४३ च्या सुमारास पहिले अपत्य जन्मले नंतर दुसरी दोन अपत्ये पोटात असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांची प्रसुती २० मिनिटांच्या अंतराने झाली. सध्या तिन्ही बाळांना बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे. मात्र, या महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे, त्यामुळे त्यांना अर्थिक मदतीची गरज आहे. या महिलेचे पती अत्यंत गरीब असल्याने ते त्यांची काळजी घेऊ शकत नाहीत, असे डॉक्टर कुंडुंबले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात यापूर्वी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनाही तिळे झालेले आहे. तशीच घटना निलंगा येथे घडली आहे. या विषयी सर्वत्र चर्चा चालू आहे. दोन वेळाच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व रोजगारासाठी भटकणाऱ्या आई-वडिलांच्या पोटाला तिळे झाल्याने, त्यांचे पालनपोषण कसे करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

Intro:निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म अर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने नवजात तिळ्याच्या आरोग्यास धोका डॉ कुडूंबले यांचे मत बोयणे कुटुंबास मदतीची गरज...Body:बाॕलिवुड मधील प्रसिद्ध नृत्य दिगदर्शीका फराह खान नंतर निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्याला जन्म.....

निलंगा/ प्रतिनिधी

गायञी सोपान बोयणे राहणार येलमवाडी ता.निलंगा जिल्हा लातूर येथिल महिलेने निलंगा शहरातील एका खाजगी दवाखान्यात तिळ्याला जन्म दिला.तिळ्यासह मातेची तब्येत बरी आहे.आठव्या महिण्यातच सदरील मातेची वैद्यकीय गुंतागुंतीमुळे प्रसुती करावी लागली या महिलेने यापूर्वी जुळ्यांना जन्म दिला होता.यावेळी या महिलेला दोन मुली व एक मुलगा असे तिन अपत्य झाले आहे.तिन्ही बाळांचे वजन वैद्यकिय मापकानुसार कमी असल्याचे डाॕक्टरांनी सांगितले आहे.सदर महिलेची प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी डॉ एम.एन.कुंडुंबले यांनी प्रयत्न केले दिनांक १७ रोजी दुपारी १२.४३ वाजता पहिले अपत्य जन्मले नंतर दुसरे दोन अपत्य पोटात असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांचेही प्रसुती २० मिनिटांच्या फरकाने झाली सध्या तिन्ही बाळांना बाळ तज्ञाच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे माञ या महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे त्यामुळे त्यांना अर्थिक मदतीची गरज आहे.सदरील महिलेचे पती अत्यंत गरीब असल्याने ते त्यांची काळजी घेऊ शेकत नाही असे डॉक्टर कुंडुंबले यांनी सांगितले,

असे महाराष्ट्रात यापूर्वी चिञपट क्षेञातील प्रसिद्ध नृत्य दिगदर्शीका फराह खान यांनाही तिळे झालेले आहे.तशीच घटना निलंगा येथे घडली आहे याविषयी चर्चा सर्वत्र चालू आहे.Conclusion:यापूर्वी दोन अपत्य झाले होते आता तिन अपत्य झाले आहेत.निसर्गाची तराह न्यारी दोन वेळाच्या जेवणासाठी भटकणा-या आई वडीलांच्या पोटाला तिळे यांचे पालनपोषण कसे करावे मोठा प्रश्न आवासून उभा....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.