ETV Bharat / state

Father death Latur : वडिलाच्या मृतदेह असताना मुलाने दिला दहावीचा पेपर; चापोलीच्या सुरजच्या नशिबी नियतीचा खेळ

author img

By

Published : Mar 16, 2022, 5:15 PM IST

While the father was dead, the son given ssc paper chapoli latur
वडिलाच्या मृतदेह असताना मुलाने दिला दहावीचा पेपर

लातूर जिल्ह्यातील चाकुर तालूक्यातील चापोली येथील कामगार तात्याराव किशन भालेराव (वय 40 वर्ष ) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ( Father death Latur ) घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांचा मुलगा सूरज याने भालेराव याने वडीलांचा मृतदेह घरात असताना काळीज घट्ट करुन आधी दहावीचा पेपर दिला. ( son given ssc paper while father death )

लातूर - जिल्ह्यातील चाकुर तालूक्यातील चापोली येथील कामगार तात्याराव किशन भालेराव (वय 40 वर्ष ) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ( Father death Latur ) घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांचा मुलगा सूरज याने भालेराव याने वडीलांचा मृतदेह घरात असताना काळीज घट्ट करुन आधी दहावीचा पेपर दिला. ( son given ssc paper while father death )

नियती कुणासोबत काय खेळ खेळेल हे कुणालाच ठावूक नाही. लातूरच्या चाकूर तालुक्यातील चापोली येथील कामगार तात्याराव किशन भालेराव (४०) यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. घरात पहाटे वडीलांचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांचा मुलगा सूरजचा त्याच दिवशी सकाळी 11 वाजता दहावीचा पहिला पेपर होता. वडिलांच्या निधनाने दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला असतानाही त्याने पहिल्यांदा शिक्षणाला महत्त्व दिले. वडिलांचा मृतदेह घरात ठेवून संजीवनी विद्यालयात काळीज घट्ट करुन दहावीचा मराठी विषयाचा पहिला पेपर दिला. दुपारी पेपर सुटल्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात पित्याच्या चितेला भडाग्नी दिला.

मौजे चापोली येथील तात्याराव भालेराव हे आपल्या कुटुंबीयांसह गावातीलच एका वीटभट्टीवर मजुरी करतात. मागील काही दिवसांपासून तात्याराव आजारी होते. मंगळवारी पहाटे त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांचा मुलगा सुरज भालेराव येथील संजीवनी विद्यालयात इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकत आहे.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : पुण्यातील 'ती' बेपत्ता तरुणी गोव्यात सापडली; इंजेक्शन देऊन पळवल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांनी रोजगार करून आजपर्यंत शिकवले आहे, याची जाणीव ठेवत सुरजने वडीलांचे दुर्दैवी निधन झाले तरी शिक्षणाला महत्व देत त्याने दहावीचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी व चापोलीतील नागरिकांनी तात्याराव भालेराव यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. तात्याराव भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.