Poisoning in a wedding : निलंगा तालूक्यात लग्नाच्या जेवणामधून सुमारे 300 जणांना विषबाधा

author img

By

Published : May 23, 2022, 3:22 PM IST

Updated : May 23, 2022, 5:59 PM IST

Poisoning in a wedding

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालूक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील एका लग्न समारंभातील जेवणामधून (wedding meal) सुमारे तिनशे जणांना विषबाधा (Poisoning around 300 persons) झाली आहे. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय व अंबुलगा देवणी तालुक्यातील वलांडी जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

निलंगा/लातूर : निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीच्या विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी रोजी दुपारी केदारपूर येथे संपन्न झाला. केदारपूर काटेजवळगा जवळगा अंबुलगा सिंदखेड सह अनेक गावातून लग्न कार्यासाठी आलेल्या व-हाडी लोकांनी भात, वरण, बुंदी, चपाती आणि वाग्यांच्या भाजीचे जेवणाचा (wedding meal) आस्वाद घेतला. जेवणानंतर सर्व व-हाडी आपल्या गावी निघून गेले. घरी पोहचताच सायंकाळपासून व-हाड्यांच्या पोटात दुखायला लागले. यात सुमारे 300 वऱ्हाड्यांना विषबाधा झाली (Poisoning around 300 persons) आहे.

पोट दुखणे, उलट्या, जुलाब असे होत असल्याने देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा( बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवळगा,जवळगा उपकेंद्र येथे व खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जवळपास तीनशे व-हाडीना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



ही विषबाधा ही वरणातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या लोकांनी वरण खाल्ले त्यांनाच विषबाधा झाली आहे. तर वरण न खाणा-या व-हाडीना काही झाले नाही असे उपचार घेत असलेले वऱ्हाडी सांगत आहेत. लहान मुलांना मात्र याचा मोठा ञास होत आहे. पोटात दुखत असल्याने, तसेच उलट्या होत असल्याने त्याना याचा मोठा ञास सहन करावा लागत आहे. रात्रभर व-हाड्यांना उपचार केल्याने त्यांची तब्येत बरी आहे. परंतु अजूनही त्यांचा त्रास कमी झालेला नाही तसेच आणखी वऱ्हाडी पोटाच्या त्रासामुळे भरती होत आहेत.

Last Updated :May 23, 2022, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.