ETV Bharat / state

सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

author img

By

Published : Mar 17, 2020, 3:19 PM IST

Updated : Mar 17, 2020, 3:50 PM IST

जिल्ह्यात सद्यस्थितीला एकही कोरोना रुग्ण किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुणे- मुंबईहुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत समाज माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

डॉ. दत्ता अंबेकर
डॉ. दत्ता अंबेकर

लातूर - कोरोनाची लक्षणे आणि सर्दी झालेल्या रुग्णांमधील लक्षणे सारखी दिसतात. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता नेहमीप्रमाणे तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी आवाहन केले. तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असताना स्वत: बरोबर इतरांची काळजी घ्या, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीला एकही कोरोना रुग्ण किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुणे- मुंबईहुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत समाज माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती

राज्यात ३९ रुग्ण हे कोरोनाची लागण झालेले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वच जिल्ह्यात राबविली जात आहे. ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसू लागली तरी अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.

आगामी पंधरा दिवस राज्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे संशयितांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि निरोगी नागरिकांनी इतरांची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. दत्ता आंबेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा-कोरोना इफेक्ट: तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद

कोरोना होवू नये, यासाठी अशी घ्या काळजी-

कोरोना होवू नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे डॉ. दत्ता अंबेकर यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी जावू नये, हात स्वच्छ धुणे आणि सर्दी झालेल्या व्यक्तीपासून १ मीटर दूर अंतरावर राहावे, असा त्यांनी सल्ला दिला.

हेही वाचा-Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी लागू

सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांत कोरोनाची भीती, डॉक्टरांनी दिला हा सल्ला

सर्दी-खोकला असलेले अनेकजण कोरोनाची तपासणी करा, अशी मागणी करत आहेत. यावर डॉक्टर अंबेकर म्हणाले, कोरोनाची आणि सर्दीची लक्षणे जवळपास सारखी आहेत. त्यामुळे कृपया घाबरू नका. जवळच्या दवाखान्यात जा. गुगलवरून सर्च करत बसू नका. कारण लक्षणे सारखीच वाटत असल्याने तशी भीती निर्माण होते. हा हायपोकँड्रिस नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जर लक्षणे दिसली तर त्रासून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास

प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करा-

कोरोना हा विशिष्ट वर्गालाच होतो असे नाही. त्यामुळे विलगीकरणात असलेल्या लोकांनी अथवा संशयित कोरोनाच्या रुग्णांनी स्वत:ला दोषी मानू नये. विलिनीकरणातील व सर्वच नागरिकांनी प्रतिकारक्षमता चांगली ठेवावी. त्यासाठी 'क' जीवनसत्वे आणि पालेभाज्या खाणे व योग्य असा व्यायाम करणे आववश्यक आहे. नागरिकांनी रस्त्यावरील उघडे आणि थंड पदार्थ खावू नयेत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करून या परिस्थितीला आपण सामोरे जावू या.

समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास ठेवू नका-

समाज माध्यमातून कोरोनाच्या नावाने खूप संदेश येत आहेत. काही संदेश चुकीचे येतात. आपण नेहमीपेक्षा अधिक फिट राहण्याची वेळ आहे. तुम्ही फिट राहा आणि इतरांनाही फिट राहण्यासाठी सहकार्य करा. अतिआत्मविश्वास दाखवू नका, तसेच अफवांना बळी पडू नका, असे त्यांनी आवाहन केले.

Last Updated :Mar 17, 2020, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.