ETV Bharat / state

Latur Crime News : पोलिसांचा रुद्रावतार, आरोपीची काढली ठाण्यापर्यंत धिंड

author img

By

Published : Mar 17, 2022, 3:52 PM IST

Updated : Mar 17, 2022, 4:10 PM IST

Criminal Rally To police Station
Criminal Rally To police Station

एका अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भर रस्त्यात खाकीचा प्रसाद देत ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली ( Criminal Rally To police Station Latur ) आहे. या गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल 18 गुन्हे दाखल ( Latur Police Arrested Criminal ) आहेत.

लातूर - एका अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भर रस्त्यात खाकीचा प्रसाद देत ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली ( Criminal Rally To police Station Latur ) आहे. या गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल 18 गुन्हे दाखल ( Latur Police Arrested Criminal ) आहेत. गौस मुस्तफा सय्यद असे या आरोपीच नाव आहे.

गौस मुस्तफा सय्यद शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. एका अल्पवयीन मुलीला 14 मार्च रोजी या आरोपीने मारहाण केली होती. तसेच त्या परिसरात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्या मुलीने विवेकानंद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याच्या शोधात असताना तो ज्ञानेश्वर नगर भागात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विवेकानंद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, गौस मुस्तफा सय्यद या आरोपीला पोलिसांनी गाडीतून न नेता रस्त्यावरुन चालवत पोलिसी खाक्या दाखवत ठाण्यापर्यंत नेले.

आरोपीची काढली ठाण्यापर्यंत धिंड

सदरील आरोपी ज्या भागात दशहत निर्माण करत होता. त्याच भागात त्याची पोलिसांनी भर रस्त्यात फटके देत वरात काढली. त्याची रस्त्यावरुन काढलेली वरात नागरिकांनी पाहत समाधान व्यक्त केले. अशाप्रकारे कोणी कृत्य करत असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क करावे. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विवेकानंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा - NCP Important Meet : पाच राज्यांचे निकाल, राज्यातील परिस्थिती.. शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

Last Updated :Mar 17, 2022, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.