ETV Bharat / state

कोरोनाबाधितांसाठी लातूर जिल्हा प्रशासनचा '4डी' पॅटर्न

author img

By

Published : Aug 9, 2020, 2:39 PM IST

लातूरमध्ये कोरोना रूग्ण हे इतरांप्रमाणेच आहेत, समाजापासून ते वेगळे नाहीत याची जाणीव सातत्याने रुग्णांना करुन दिली जात आहे. मेडीटेशन, काउन्सलिंग, व्यायाम आणि झुंबा यासारख्या बाबींमुळे रुग्णाचा वेळ हसत खेळत जात आहे. विविध तज्ज्ञ मंडळींबरोबर चर्चा करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा उपक्रम राबवला आहे.

Latur
लातूर

लातूर - गेल्या पाच महिन्यांपासून जशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षाही अधिक पटीने कोरनाबद्दलची भीती रुग्णांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तयार झाली आहे. याचे दुष्परिणाम नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहेत. याचाच अभ्यासकरून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी आणि खच्चीकरण होऊ नये म्हणून लातूर जिल्हा प्रशासनाने अनोखा '४डी' उपक्रम राबवला आहे.

'जे नवं, ते लातूरला हवं', अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच आतापर्यंत लातूरने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. गेल्यावर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन नाही तर मूर्ती दान, असा उपक्रम राबवण्यात आला होता आणि त्याचे सर्वत्र कौतुकही झाले होते. आता कोरोनामुळे प्रत्येकाच्या मनात धडकी भरली आहे. कोविड सेंटरमधील रुग्णांची मानसिकता पाहून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी '४डी' हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णांची मानसिकता उत्तम रहावी यासाठी मेडीटेशन आणि काउन्सलिंग केले जात आहे, तर रूग्ण फिजिकली फिट रहावा यासाठी व्यायाम आणि झुंबा डान्स घेतला जात आहे. सोबत दर्जेदार अन्न आणि स्वच्छता किटही रुग्णांना देण्यात आले आहेत.

लातूर जिल्हा प्रशासनचा '4डी' पॅटर्न

कोरोना रूग्ण हे इतरांप्रमाणेच आहेत, समाजापासून ते वेगळे नाहीत याची जाणीव सातत्याने रुग्णांना करुन दिली जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमाला आता तीन आठवड्याचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे रुग्णांना देखील वेगळे समाधान मिळत असून आपण कोरोनाबाधित आहोत, या मानसिकतेमधून ते आता बाहेर पडत आहेत. मेडीटेशन, काउन्सलिंग, व्यायाम आणि झुंबा यासारख्या बाबींमुळे रुग्णाचा वेळ हसत खेळत जात आहे. विविध तज्ज्ञ मंडळींबरोबर चर्चा करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हे उपक्रम राबवण्याचे ठरवले होते. आता त्याचा प्रत्यक्ष परिणामही दिसू लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.