Latur Crime News : सोशल मीडियावर दुसरा भेटला अन् तिने  पहिल्याचा काटा  काढला; पंढरपूरच्या प्रेमाचा लातुरात शेवट

author img

By

Published : Jun 4, 2022, 5:43 PM IST

Crime News

पंढरपूरातील एका महिलेने 60 वर्षीय प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून केला आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी एका 40 वर्षीय महिलेसह तिच्या 23 वर्षीय प्रियकराला अचक केली ( Woman Murder 60 Year Pandharpur Boyfriend ) आहे.

लातूर - मागील आठवड्यात निलंगा तालुक्यातील पानचिंचोली नजिक रोडच्या कडेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे गुढ उकलण्यात निलंगा पोलिसांना यश आले आहे. पंढरपूरच्या एका महिलेने 23 वर्षीय प्रियकराच्या मदतीने 60 वर्षीय प्रियकराचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Woman Murder 60 Year Pandharpur Boyfriend ) आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी 40 वर्षीय विवाहितेसह दोघांना अटक केली ( Nilanga Police Register Case Against Pandharpur Woman ) आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (28 मे) निलंगा तालुक्यातील पानचिंचोली जवळ रस्त्याच्या कडेला एका 60 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमत: सदर व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. पण, नंतर हा अपघात नसून खुन असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील मौजे सुपली येथील रहिवाशी भानुदास जगन्नाथ माळी (वय, 60) यांचे पंढरपूर येथील 40 वर्षीय साधना ( रा. दत्त मंदिराजवळ, सांगोला रोड, पंढरपूर) या महिलेशी अनैतिक संबंध होते. दोघांचे हे संबंध अनेक वर्षांपासून असल्यामुळे मयत माळी हे साधनाच्या घरी कधीही येऊ लागला होता. त्याच्या वागण्यामुळे ही महिला वैतागली होती.

याच काळात साधनाची ओळख लातूरच्या निलंगा तालुक्यातील मौजे इनामवाडी येथील 23 वर्षीय अमरनाथ अशोकराव किन्ने याच्यासोबत झाली. अमरनाथ हा ड्रायव्हर असल्यामुळे गाडीसाठी क्लिनर पाहिजेत, अशी पोस्ट त्याने त्याच्या मोबाईनंबरसह सोशल मीडियात टाकली होती. त्यावरुन साधनाने अमरनाथला संपर्क साधला आणि दोघांची ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मयत भानुदास व अमरनाथ या दोघांसोबतही साधनाचे अनैतिक संबंध सुरू असताना तिने अडसर ठरणाऱ्या भानुदास याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

निलंगा येथे जायचे आहे, असे सांगून भानुदासला साधना आणि अमरनाथने आपल्या गाडीत बसवले. निलंगा येथे ते सर्व पोहोचले. पुढे निलंग्याहून लातूरकडे येताना रात्री 10-11 वाजेच्या सुमारास गाडीतच भानुदास माळी याचा दोघांनी गळा आवळला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देत दोघेही पंढरपूरला निघून गेले.

लातूरच्या पानचिंचोली जवळ अनोळखी मृतदेह सापडला होता. त्यापूर्वीच म्हणजे (21 मे) रोजी मयत भानुदास माळी हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पंढरपूर पोलिसांत दाखल केली होती. त्यामुळे पंढरपूर पोलीस तपास करीत असताना 28 मे रोजी भानुदास माळी यांच्या मोबाईलचे शेवटचे ठिकाण निलंगा येथे सापडले. त्यामुळे पंढरपूर पोलिसांनी निलंगा पोलिसांशी संपर्क साधला आणि हा प्रकार समोर आला. परंतु, तो पर्यंत अनोळखी मृतदेह म्हणून मयत भानुदास माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, माळी यांच्या अंगावरील कपडे आणि त्यांच्या गळ्यातील तुळशीमाळ त्यांच्या मुलाने ओळखली आणि या खुनाला सात दिवसांनंतर वाचा फुटली. या प्रकरणी मयत भानुदासचा मुलगा सुशांत माळी यांच्या तक्रारीवरुन निलंगा पोलिसांत 150/22 कलम 302, 201 भादंवि अन्वये साधना व प्रियकर अमरनाथवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Death Penalty To Rape Accused : मुंबईत बलात्काराच्या वेगवेगळ्या घटनेत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा, कायदेतज्ञ काय म्हणतात?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.