ETV Bharat / state

'शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची, कायदेशीर दोन्ही लढाई लढाव्या लागणार'

author img

By

Published : Oct 16, 2020, 8:50 PM IST

swabhimani chief raju shetty spoke on sugarcane frp kolhapur
शिरोळ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजू शेट्टी बोलताना.

येत्या 2 नोव्हेंबरला ऊस परिषद होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.

कोल्हापूर - साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून सह्या घेतल्या आहे. यामुले शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची आणि कायदेशीर, अशा दोन्ही लढाया लढाव्या लागणार आहेत, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेटटी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

राजू शेट्टी (प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

तर अखेर स्वाभिमानाची यावर्षीची सुद्धा ऊस परिषद होणार आहे. चालू वर्षीची 19वी उस परिषद 2 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार, अशी माहितीही राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे 2 नोव्हेंबरला होणाऱ्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. यात किती दर मागितला जातो? हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - जलयुक्त शिवारचे वास्तव... सत्ताधाऱ्यांकडून एसआयटी चौकशीचे स्वागत, विरोधकांची टीका

शेट्टी म्हणाले, सध्या सरकारने सिनेमाग्रह, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट्स यांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यानीच 1 नोव्हेंबरनंतर राज्यातील लाॅकडाऊन शिथिल करणार असल्याचे सुतोवाच केले. याच पार्श्वभुमीवर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून गेली 18 वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या उस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे आणि 19वी ऊस परिषद यशस्वी करण्याचे आवाहनही शेट्टी यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगीरे, मिलींद साखरपे, अजित पोवार यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.