ETV Bharat / state

कोल्हापूर : आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या नंदवाळ नगरीत शांतता

author img

By

Published : Jul 20, 2021, 5:58 PM IST

silence in nandwal city on aashadhi ekadashi  in kolhapur
कोल्हापूर : आषाढी एकादशीला पांडुरंगाची नंदवाळ नगरी सून्न

कोरोना पार्श्‍वभूमीवर आषाढी सोहळा रद्द झाल्याने हरिनामाचा जय घोष, राम कृष्ण हरीचा गजर आणि माऊली या शब्दाविना पांडुरंगाची नंदवाळ नगरी सुन्न झालेली बघालयला मिळाली.

कोल्हापूर - प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे आषाढी एकादशी सोहळा पार पडत असतो. मात्र, यंदा कोरोना पार्श्‍वभूमीवर ही सोहळा रद्द झाल्याने हरिनामाचा जय घोष, राम कृष्ण हरीचा गजर आणि माऊली या शब्दाविना पांडुरंगाची नंदवाळ नगरी सुन्न झालेली बघालयला मिळाली. दरम्यान, कोल्हापुरातून निघणारी पायी दिंडी यंदाही वाहनातून नेण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त तौनात करण्यात आला होता.

व्हिडीओ

आधी नंदापूर मग पंढरपूर -

आषाढी एकादशी दिवशी नंदवाळ याठिकाणी अगोदर पांडुरंगाचा रहिवास आणि बारानंतर पंढरपूर येथे रहिवास अशी आख्यायिका आहे. प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र नंदवाळ येथे आज आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावात सोहळा पार पडला. दरवर्षी आषाढी एकादशीला कोल्हापूर ते नंदवाळ अशी पायी वारी होते. त्यात लाखो भाविकांचा सहभाग असतो. मात्र, कोरोनामुळे ही वारी सुद्धा रद्द करण्यात आली. केवळ मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील पायी दिंडी आज श्री क्षेत्र नंदवाळ येथे नेण्यात आली. फुलांनी सजवलेल्या केएमटी बसमधून ही पालखी श्रीक्षेत्र नंदवाळ येथे नेण्यात आली. निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि ज्ञानेश्वरांचा गजर करत ही पालखी श्री क्षेत्र नंदवाळ येथे पोहचली.

ग्रामस्थ आणि पोलिसांकडून नंदवाळ लॉक -

दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी हजारो भक्त नंदवाळ या गावी येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून श्री क्षेत्र नंदवाळ चारी बाजूंनी लॉक केले होते. केवळ मोजक्याच ग्रामस्थांच्या व वारकर्‍यांच्या उपस्थित आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडला.

'कोरोनाचे संकट नाहीसे कर', वारकऱ्यांचे पांडुरंगाला साकडे -

आषाढी एकादशी असो की भागवत एकादशी असो वारकऱ्यांची पावले ही नंदवाळच्या दिशेने जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद आहेत. तसेच वारी रद्द करण्यात आली आहेत. 'जगावरील कोरोनाचे संकट नाहीसे कर आणि पुन्हा भक्तीचा कुंभमेळा भरू दे' अशी मागणी वारकऱ्यांनी पांडूरंगाकडे केली.

हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.