ETV Bharat / state

Non Hindu Shop Ban Dispute : 'कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाहेर गैर हिंदू व्यावसायिक; मात्र कधीही वाद झाला नाही'

author img

By

Published : Mar 30, 2022, 4:45 PM IST

Non Hindu Shop Ban Dispute
Non Hindu Shop Ban Dispute

कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद ( Karnatak Hijab Dispute ) अजून ताजा असतानाच आणखी एका घटनेनंतर वादाने डोकं वर काढले आहे. कर्नाटकातील हिंदू मंदिराबाहेर गैर हिंदूंनी ( Ban Non Hindu Shop In Front Of Hindu Temple ) दुकाने लावू नये, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आहे. मात्र, कोल्हापूरच्या अंबाबाईमंदिरासमोर अनेक दिवसांपासून मुस्लिमांची ( Muslim Shop In Front Of Kolhapur Ambabai Temple ) दुकाने आहेत.

कोल्हापूर - कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद ( Karnatak Hijab Dispute ) अजून ताजा असतानाच आणखी एका घटनेनंतर वादाने डोकं वर काढले आहे. कर्नाटकातील हिंदू मंदिराबाहेर गैर हिंदूंनी ( Ban Non Hindu Shop In Front Of Hindu Temple ) दुकाने लावू नये, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोल्हापूरात अंबाबाई मंदिराबाहेर ( Muslim Shop In Front Of Kolhapur Ambabai Temple ) अनेक मुस्लीम तसेच इतर धर्मांचे विक्रेते आपला व्यवसाय चालवत आहेत. मात्र, इथे आजपर्यंत कधीही कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या या घटनेप्रमाणे घटना घडल्या नाहीत. शिवाय इथे सर्वच मिळून-मिसळून राहतात. त्यामुळे आजवर कधीही असे वाद घडले नाहीत आणि घडू सुद्धा देणार नसल्याचे अनेकजण म्हणाले आहेत.

व्यावयायिकांच्या प्रतिक्रिया

अंबाबाई मंदिराबाहेर अनेक मुस्लिम व्यक्तींची दुकाने - अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. याच भाविकांवर आपला उदरनिर्वाह चालविणारे अनेक छोटे मोठे व्यावसायिक इथल्या मंदिराबाहेर आहेत. यामध्ये सर्व समाजाचे व्यावसायिक आहेत. मंदिराच्या चारही दरवाजाच्या आवारात काही मुस्लीम समाजातील बांधव सुद्धा आपला व्यवसाय चालवत आहेत. अनेकजण तर 40 वर्षांपासून आपला व्यवसाय सुरू असल्याचे म्हणतात. अंबाबाई मंदिरमधील घाटी दरवाजाच्या बाजूलाच हार, वेणी विक्रीचा व्यवसाय चालवत असलेल्या मोसीना सोंबरे यांनी सुद्धा आपल्याला या व्यवसायात आजपर्यंत कोणीही दबाव टाकला नसल्याचे म्हटले आहे. शिवाय आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने इथे व्यवसाय करतो. आमची अंबाबाई वर सुद्धा प्रचंड श्रद्धा आहे शिवाय दररोज अंबाबाईचे दर्शन घेतो, असेही त्या म्हणाल्या.

'हे शाहूंच्या विचाराचं शहर' - दरम्यान, इथले व्यावसायिक आप्पासो जासूद हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिर बाहेर व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यांनी सुद्धा कोल्हापूर जाती धर्मावरूम कधीही कोणतीही चुकीची घटना घडली नाही. शिवाय घडू सुद्धा देणार नसल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर हे शाहूंच्या विचारावर चालणारे शहर आहे. इथे कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत. आम्ही आजपर्यंत एकमेकांच्या सोबतच मिळून व्यवसाय करत आहे. कधीही हा या जातीचा आणि ती इतर जातीचा हा विचार डोक्यात आला नाही. मंदिर परिसरात मुस्लीम महिला आपल्या घराचा खर्च चालविण्यासाठी व्यवसाय करत आहेत. कित्येक चर्मकार समाजाचे लोकं इथे चप्पल विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे आम्ही जाती धर्माला बाजूला ठेवत एकोपा ठेवला असल्याची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण - कर्नाटकमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात हिंदू मंदिराबाहेर लावण्यात आलेले पोस्टर चर्चेत आहेत. केवळ चर्चेत नसून त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. अनेक मंदिराबाहेर असे पोस्टर लावण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये गैर हिंदू लोकांनी मंदिर परिसरात कोणत्याही पद्धतीने दुकान तसेच स्टॉल लावू नये, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Kerala Govt Decision on Alcohol : केरळ सरकारचा 'मद्य' निर्णय! आता आयटी पार्कमध्ये पब सुरू करता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.